🌟शिवछत्रपती सामाजिक/प्राणीमित्र/स्वच्छता सेवा रत्न पुरस्कार 2023 लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना प्रदान...!🌟परभणीत मराठा सेवा मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान🌟

शिवछत्रपती स्वच्छता प्राणी मित्र धार्मिक सामाजिक विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे प्राणीमित्र स्वच्छता दूत धार्मिक सेवक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर हे (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष) या माध्यमातून जिल्ह्यात व शहरात मराठवाड्यात आपल्या समाजप्रबोधनाच्या कार्यातून कार्य करत असतात म्हणून सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार व गौरव करण्यात आला 

या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर प्रमुख पाहुणे मराठा सेवा मंडळचे प्रदेशाध्यक्ष नितीन देशमुख, रामकृष्ण हरी अन्नदान छत्र चे अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी, ज्ञानेश्वर पवार, वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाड्याचे अध्यक्ष ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील, गट शिक्षण अधिकारी मंगेश नरवाडे सर,राष्ट्रवादीचे पदवीधर चे अध्यक्ष रामेश्वर आवरगंड सर,  शिव व्याख्याते विशाल देशमुख, बाल व्याख्याते आरोही खंदारे पाटील, संजय कदम, भाजपचे शहर उपाध्यक्ष सुनील देशमुख, दिलीप गिराम, राजकीय सामाजिक क्षेत्रातले उपस्थित होते *कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व जयंती महोत्सव अध्यक्ष मराठा सेवा मंडळ चे महानगर जिल्हाध्यक्ष गोविंद भाऊ इक्कर पाटील,  मुख्य संयोजक उत्सवाचे कार्याध्यक्ष उपसरपंच मंगेश भरकड, कार्यक्रमाचे निमंत्रक जयंती महोत्सव चे उपाध्यक्ष दीपक बिडवे* यांच्यावतीने नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांचा सत्कार व सन्मानचिन्ह दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता भजन गल्ली सुभाष रोड परभणी करण्यात आला अशी माहिती जयंती महोत्सव अध्यक्ष गोविंद इक्कर पाटील यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या