💥चिखलीत 19 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सैनिक सेलच्या जिल्हा स्तरीय मेळाव्याचे आयोजन....!


💥सदर कार्यक्रमासाठी आमदार रोहित दादा पवार,माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती💥

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. सदर यात्रा दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने चिखली येथे आशीर्वाद मंगल कार्यालय (सवना फाटा )बुलढाणा रोडवर महा प्रबोधन यात्रेची आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी आमदार रोहित दादा पवार , माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे , जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी  हे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त जिल्ह्यातील सैन्य दलात सेवा देत असणारे व निवृत्त झालेले सर्व फोर्सचे आजी माजी सैनिक, सी.आर.पी, बी.एस.एफ. तथा सर्व फोर्सचे आजी-माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महाप्रबोधन यात्रेस व सैनिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल च्या वतीने करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये  व पत्रकार परिषदेत खालील पदाधिकारी हजर होते प्रमोद पाटील- विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी, रवींद्र तोडकर - अध्यक्ष चिखली राष्ट्रवादी, डॉ विकास मिसाळ कार्याध्यक्ष चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, राजीव जावळे पाटील माजी उपसभापती कृऊबास चिखली तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस  किसान सभा, संतोष लोखंडे स्विय सहायक माजी मंत्री राजेंद्र शिंगणे,  जगन्नाथ वाघ - माजी सैनिक सेल तालुका अध्यक्ष, संजय खेडेकर माजी प्रशासक कृउबास, भिकाजी खेडेकर तालुका उपाध्यक्ष, काकड माजी सैनिक सेल तालुकाध्यक्ष सिंदखेडराजा जिल्हा सचिव मधुकर पवार, तालुका उपाध्यक्ष विष्णू मुंढे, तुकाराम बकाल सदस्य सिंदखेड राजा राष्ट्रवादी सैनिक सेल कारभारी   चौरे हे हजर होते. यानिमित्त समस्त माजी सैनिक सी.आर.पी, बी.एस.एफ. तथा सर्व फोर्सचे आजी-माजी सैनिक तसेच राष्ट्रवादी व तमाम जनता यांनी उपस्थिती रहावे असे आवाहन चिखली तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सैनिक जिल्हा अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले आहे...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या