🌟परभणीत दि.05 मार्च रोजी सोनार समाजाचा सामूहीक विवाह सोहळा...!🌟राज्याचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विवाह सोहळ्याचे आयोजन🌟 

परभणी (दि.23 फेब्रुवारी) :  माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 मार्च रोजी सोनार समाजाच्या वतीने भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा व सामूहीक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सोनार सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत डहाळे यांनी दिली.

         कृषि विद्यापीठ रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्याहस्ते व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव, माजी आमदार श्रीमती अनुसया खेडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, श्री श्री 108 दत्तात्रय दहिवाळ महाराज, हभप मौनी उर्फ अंबादास दहीवाळ महाराज, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंतराव काळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परिचय मेळाव्यासह विवाह सोहळ्याच्या दृष्टीकोनातून सोनार सेवा महासंघाच्या महिला आघाडीसह महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तयारीसह लागले आहेत, असे संस्थापक अध्यक्ष डहाळे यांनी म्हटले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या