💥चैन स्नॅचींग प्रकरणातील ०६ महिन्यांपासून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक....!


💥आरोपींवर यापूर्वीदेखील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-पो.स्टे.वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.६२५/२२, कलम ३९२, ३४ भादंवि मध्ये सहभाग निष्पन्न झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींवर यापूर्वीदेखील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

          वाशिम येथील बालाजी मंदिरातून दर्शन करून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे मणी मंगळसूत्र जुना पशुवैद्यकीय दवाखाना, शुक्रवारपेठ, वाशिम येथून दोन इसमांनी मोटार सायकलवर येत जबरीने ओढून तोडून घेऊन पळून गेले होते. सदर प्रकरणी पो.स्टे.वाशिम शहर येथे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे  संघपाल भारत कांबळे, वय २७ वर्ष, रा.भीम नगर, वाशिम यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यामध्ये ०२ पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असून सदर दृष्टीने तपास करत आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. संघपाल भारत कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी देखील पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.१८४/२२, कलम ३९२ भादंवि., अप.क्र.१९०/२२, कलम ३९२, ३४ भादंवि.,  अप.क्र.१९१/२२, कलम ३९२, ३४ भादंवि., अप.क्र.१९२/२२, कलम ३९२, ३४ भादंवि. अन्वये गुन्हे दाखल आहेत.  नागरिकांनी अश्या प्रकारचे गैरव्यवहार व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

          सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोहवा.सुनील पवार, दीपक सोनवणे, गजानन अवगळे, नापोकॉ.प्रशांत राजगुरू, चानापोकॉ.संदीप डाखोरे नेमणूक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, पोकॉ.गोपाल चौधरी नेमणूक सायबर सेल, वाशिम यांच्या तांत्रिक सहाय्याने पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या