💥वृक्ष संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे "प्रभावतीनगरी गौरव पुरस्कारा"ने सन्मानित....!


💥"वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती"💥


पुर्णा/ताडकळस :- "मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे..!" या लोककवी बा.भ.बोरकरांच्या काव्यपंक्ती सार्थ ठरविणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉ.बाबासाहेब माणिकराव ठोंबरे हे होय, उंदरी सारख्या (ता.केज,जि.बीड) आडवळणाच्या एका गावखेड्यात, गाय, माती, शेती, निसर्ग आणि माणसांवर नितांत प्रेम करणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला एक युवक, आपल्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उरात एक ध्येय बाळगून, सोबत आई - वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी बाहेर पडले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून कृषि पदवी घेऊन मुहूर्तमेढ रोवली व पुढे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विषयात आचार्य पदवी घेऊन त्यावर गुढी उभारली..! 

कृषि विद्यापीठ सेवेत असताना पदांचे एकेक शिखर पादाक्रांत करीत आज ते लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे 'सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य' या पदाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. तत्पूर्वी ते कृषि महाविद्यालय, आंबेजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य याच पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घन वन वृक्ष लागवड, योगा पार्क इत्यादी संकल्पना महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरात त्यांनी राबविल्या. अत्यंत अल्पावधीत तब्बल 26 हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून आणून संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास खऱ्या अर्थाने लोकाभिमूख केले. कृषि व कृषिपूरक क्षेत्रात ही त्यांचे कार्य उल्लेखनिय ठरलेले आहे. त्यांनी देशी गोवंश, म्हैस वर्ग व शेळी - मेंढी पालनात विशेष संशोधन करून ते शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरले आहे. राष्ट्रीय स्तरांवर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच दूरदर्शन, आकाशवाणी, सोशल मिडीया, विविध नियतकालिके आणि दैनिके याद्वारे जनजागृती करून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सातत्याने भरीव योगदान दिलेले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी आणि भरीव कार्याची दखल घेऊन प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना 'वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र' प्रणित 'राष्ट्रजन फाऊंडेशन, परभणी' तर्फे 'वृक्ष संवर्धन' या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल "प्रभावती नगरी गौरव पुरस्कार - 2023" प्रदान करून त्यांना मान्यवरांकडून गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.धीरज कदम, माजी कुलसचिव डॉ.डी.ए.चव्हाण, डॉ.दिलीप मोरे, पं.उद्धवराव बापू आपेगावकर, पञकार रणजित डांगे, सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे, प्रख्यात कवी राजेश रेवले, राजेंद्र रापतवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींनी अभिनंदन केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या