💥परभणी जवळील धार येथे दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा कलशारोहन सोहळा संपन्न....!


💥परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा पार पडला💥

परभणी (दि.२८ जानेवारी) - येथुन जवळच असलेल्या धार दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा कलशारोहन सोहळा संपन्न झाला यावेळी रूढी येथील हभप.मनीषानंद महाराज पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा पार पडला, मागील सात दिवसापासून काकडा आरती गाथा पारायण हरिपाठ हरी किर्तन सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तन व महाप्रसादाने करण्यात आली,यावेळी कलशारोहन सोहळ्यास आमदार डॉक्टर राहुल पाटील, अरविंद काका देशमुख, किशोर रणेर, रामजी तळेकर, धार मंदिर समितीचे शिवाजीराव चोपडे, भगवान महाराज, ज्ञानदेव चोपडे, प्रभाकर चोपडे, धोंडीराम चोपडे, अंकुश चोपडे, उद्धव चोपडे, केशव चोपडे चोपडे, व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने संपन्न झाला यांच्यासह धार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या