💥योगेश शर्मा राज्य पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित : सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप....!


💥कै.कृष्णराव पाटील कोठावळे यांच्या स्मृतिना उजाळा💥

✍️ मोहन चौकेकर 

चिखली : नाशिक येथील कालिका देवी मंदिर संस्थान आणि क्रीडा संस्कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. कृष्णराव पाटील- कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार यंदा चिखली येथील हरहुन्नरी पत्रकार तथा चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा यांना कालिका माता मंदिर संस्थानच्या सभागृहात गुरुवारी दि. ५ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. 


       योगेश शर्मा यांनी आपल्या पत्रकारितेला सुदर्शन न्यूजचे माध्यमातून सुरूवात केली, तदनंतर दै. नवभारत, दै. नवराष्ट्र, राष्ट्रवृत्त वेब न्यूज वृत्तवाहीनी मधून त्यांनी जनमानसाच्या समस्यांना वेळोवेळी वाचा फोडली आहे. तूर्तास ते इंग्रजी दैनिक द हितवाद, दैनिक भास्कर यांच्यासह स्वत:चे पंजीकृत साप्ताहिक वृत्त नायक मधून सजग पत्रकारिता करत आहेत. 

     यावेळी बोलताना नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर म्हणाले की, आज राज्यभरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करून कालिका देवी मंदिर संस्थान आणि क्रीडा संस्कृती फाऊंडेशनने त्यांच्या कार्याला पाठबळ दिलं आहे, जे अत्यंत कौतुकास्पद आहे . 

  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे, सचिव आनंद खरे, क्रीडा संस्कृती फाऊंडेशनचे सचिव उदय खरे, खजिनदार दीपक निकम, डीवायएसपी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदोजी मराठा बोर्डिंगचे आद्य संस्थापक तसेच नाशिक शहराचे पहिले पोलीस पाटील कृष्णराव चिमणराव कोठावळे (पाटील) यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सर्व पत्रकार बांधवांना करून देण्यात आली.या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मांदियाळीत बुलढाणा जिल्ह्यातील योगेश शर्मा यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला, हे ही विशेष! 

    बीजिंग ऑलंपिकचे सदस्य तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रमुख पाहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले.या पुरस्कारा निमित्ताने त्यांचे सर्वच क्षेत्रात कौतुकाभिनंदन होत आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या