💥केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचा 'परीक्षा पे चर्चा' चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग....!


💥जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत केंद्रीय विद्यालयातील १०० वर  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला💥

परभणी (दि. २४ जानेवारी) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'परीक्षा पे चर्चा' या विषयावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत केंद्रीय विद्यालयातील १०० वर  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षा मंत्रांवर आधारित देशातील ५०० नोडल केंद्रीय विद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे प्राचार्य चौधरी यांनी सांगितले. 

चित्रकला स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय हिंगोली व परभणी येथील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या १०० स्पर्धकांसह शहरातील इतर १० शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल, परभणी येथील कु. मानसी सोनवणे यांची कृति सर्वोत्कृष्ट होती. द्वितीय रोहित शिंदे (गांधी विद्यालय), तृतीय सिद्धी यादव (गांधी विद्यालय), कु. स्नेहा खरात (बालविद्या मंदिर) आणि अमिताभ येडके (जवाहर नवोदय विद्यालय परभणी) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.  इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रधानमंत्र्यांनी लिहिलेले "परीक्षा योद्धा" हे पुस्तक देण्यात आले.

प्राचार्य एच. आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनात झालेल्या चित्रकला स्पर्धेत समन्वयक राजेंद्र सावंत आणि आनंद लिपने यांनी सहकार्य केले.  प्रा. ज्ञानेश्वर नाटकर, श्री. उमेश मेहुणकर व मंजुषा यादनिक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व इतर शाळेतील एस्कॉर्ट शिक्षकांनी सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या