💥पुर्णा शहरात उद्या मंगळवार दि.०३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती उत्सवाचे आयोजन...!


💥कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भदंन्त उपगुप्त महाथेरो यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

पुर्णा (दि.०२ जानेवारी) - मनुप्रणीत समाजव्यवस्थेने शुद्र व अतीशुद्र स्त्री वर्गाचे नैसर्गिक हक्क नाकारले होते या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या माध्यमातून आणावयाचे महत्वपुर्ण काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले देशातील पहिल्या मुख्याध्यापीका,कृतीशील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांची १९२ वी जयंती पुर्णा शहरात उद्या मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास प्रबोधनात्मक मानस ठेवून साजरी करण्यात येणार आहे.


क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भदंन्त उपगुप्त महाथेरो व भंन्ते पय्यावंश यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका विजयाताई शरद कापसे,प्रमुख पाहुणे म्हणून पुर्णा नगर परिषदेच्या सहप्रकल्प अधिकारी अंजना बिडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हाध्यक्षा सुनिताताई साळवे,अभिनव विद्या विहार प्रशालेच्या मुख्याध्यापिका संध्याताई मनोजकुमार बिडकर,जवाहरलाल नेहरु इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका आतीया मेडम,विद्याताई श्रंगारे क्षेत्रीय संमन्वयक पुर्णा यांची उपस्थिती राहणार असून या जयंती महोत्सवात निर्मलाताई लक्ष्मीकांत रेड्डी (मुख्याध्यापिका अभिनव विद्या विहार पुर्णा),डॉ.प्रतिभाताई विनय बगाटे (वैद्यकीय अधिकारी तथा त्वचा व सौंदर्य शास्त्र तज्ञ),पुष्पाताई बनसोडे (समुदाय संघटक नगर परिषद पुर्णा),डॉ.राहिलादिदी हिलाल,डॉ.ज्योतीताई लोलगे,डॉ.पिंकीताई डांगे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून या जयंती महोत्सवात माता भगिनींसह नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा मंजुशाताई मुकुंद पाटील,सचिव प्रतिभाताई श्रीकांत हिवाळे,कोषाध्यक्षा विशाखाताई एंगडे व बोधिसत्व डॉ.बि.आर.आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समिती पुर्णा यांनी केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या