💥संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने आयोजित रामकथेस उत्साहात प्रारंभ.....!


💥बंधू प्रेमाचा आदर्श रामकथेत पाहायला मिळतो ढोक महाराज यांचे प्रतिपादन💥


संभाजीनगर :- हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीने रामलीला शिवस्मारक प्रांगण बजाजनगर येथे आयोजित श्रीराम काथेस मा.विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजनाने आज उत्साहात प्रारंभ करण्यात आला. कथेप्रसंगी बजाजनगर परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण होते.  श्री गणेशाच्या वंदनेने राम कथेस सुरुवात करण्यात आली याप्रसंगी श्री.ढोक महाराज यांनी कथेच्या पहिल्या दिवशी श्री रामायण ग्रंथ महात्म्य व शिवपार्वती विवाह या विषयावर कथा प्रवचन केले. रामायणात जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, येथे बंधू प्रेमाचा आदर्श पाहायला मिळतो, तुलसी रामायण आणि राम चरित्र मानस हे धर्मग्रंथ भारतीय संस्कृतीचे प्रतीके आहेत, असे सांगत राम कथेमध्ये सहभागी होणे म्हणजे जणू काही मानसरोवरांमध्ये स्नान केल्याचा आनंद घेण्यासारखे आहे असे देखील ते म्हणाले ५:३० ते ६:३० या वेळेत कथेनिमित्त सेवरूपी हरिपाठ घेण्यात आला.


हभप. बबन महाराज चौरे, हभप. अप्पासाहेब महाराज गायके, हभप.बंडू महाराज औताडे, हभप.विजय महाराज निकम, हभप.बाळासाहेब महाराज नटकर यांच्या पुढाकाराने बजाजनगर आणि पंचक्रोशीतील वारकरी मंडळींनी श्रीराम कथेनिमित्त सेवरुपी हरिपाठ घेत मृदुंग आणि टाळाच्या ठेक्यावर विठ्ठलाचे नामस्मरण करत कार्यक्रमास सुरुवात केली. 

कथेच्या प्रारंभी महाराजांचे स्वागत करत संयोजन समितीतील शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुका प्रमुख सचिन गरड, कैलास भोकरे, राजेंद्र दानवे, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे,यांनी सपत्नीक महाराजांचे पाद्य पूजन केले त्यानंतर महाराजांच्या हस्ते प्रभू श्रीराम, सीतामाई ,श्री हनुमान प्रतिमा व ग्रंथ पूजन करून श्रीराम कथेचा संकल्प करण्यात आला.

*९५ दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती :-


आज कथेचा पहिला दिवस असून आजची कथा संपन्न झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील ९५ दंपत्यांनी या प्रसंगी आरती केली या कार्यक्रमास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधानसभा संघटक सुशील खेडकर, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, आनंद भालेकर, उपतालुका प्रमुख सचिन गरड, उद्योजक कैलास भोकरे, विष्णू जाधव, गणेश नवले, कृष्णा राठोड, सुभाष साबळे, नंदकुमार साळुंखे, शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, बिबन सय्यद, विश्वास येवले, भाऊसाहेब डमाळे, विभागप्रमुख सुदाम भंडे, बिबन सय्यद, काकाजी जीवरग, कैलास हिवाळे,  रामनाथ सुरासे, दत्तात्रय वर्पे, लखन सलामपुरे, दीपक कानडे, नामदेव सागडे, सतीश हीवाळे, संतोष चंदन, शिवाजी ढेपे, करण साळे, विशाल खंडागळे, अमोल पोटे, प्रवीण चंदन, सरपंच मनीषा धोंडरे, जयश्री दिवेकर, अनिता हेकडे, लक्ष्मीबाई पवार, सुनिता राठोड, राधा राठोड, अमर राजपूत, संध्या सदावर्ते, उपसरपंच कपिंद्र पेरे, संजय झळके, शोभा बनकर, विजय सरकटे, गौरव पाटील, अनिकेत थोरात, महेंद्र खोतकर, मनोज गायके, निलेश चव्हाण, ज्ञानेश्वर गोल्हार, सुरेश राठोड, सजन पवार, मनोज पवार, गणेश वाघ, गणेश सूर्यवंशी, महेश घोडके, अक्षय साळुंखे, प्रशांत पाथ्रीकर, गौरव खणसे, नवनाथ काळे, अण्णा कांडेकर, रमेश पाटील, महिला आघाडीच्या मंदाताई भोकरे, मीराताई पाटील, कमलताई गरड, छाया जाधव, शोभा सरकटे, अनिता डहारिया,  वैशाली जिवरग, अलका शिंदे, मीरा चव्हाण, जोत्सना सोनवणे, रूपाली शुक्ला, मंदा तुपे, सविता वैद्य, लता माळी, छाया कुकलारे, रोहिणी मुळे, मनीषा घाडगे, विद्या राठोड आदींची उपस्थिती होती....... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या