💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या....!


💥1 एप्रिलपासून 9 लाख सरकारी वाहने, 15 वर्षांहून जुनी बसेस रद्द होणार, मंत्री नितीन गडकरींची माहिती💥

 ✍️ मोहन चौकेकर

* बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी ; उद्या सुनावली जाणार शिक्षा

* पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारीला एक्स्प्रेस वेच्या सोहना-दौसा विभागाचे करणार उद्घाटन

* 1 एप्रिलपासून 9 लाख सरकारी वाहने, 15 वर्षांहून जुनी बसेस रद्द होणार, मंत्री नितीन गडकरींची माहिती

* पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा

* 2014 पासून सुरू झालेल्या 108 नंबरच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा आतापर्यंत 81 लाखांहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ 

* पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी ₹ 2 लाख-कोटींची विशेष तरतूद केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

* बीबीसी डॉक्युमेंटरीवरील बंदी संविधानाच्या विरोधात; सर्वोच्च न्यायालयात 6 फेब्रुवारीला होणार याचिकेवर सुनावणी

* पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीत स्फोट, ३२ जण ठार 

* भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

* लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला होता, 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखखान भरभरुन बोलला

* ‘पठाण’च्या यशानंतर ‘पठाण २’ येणार! दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा

* पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान, 2 तारखेला लागणार निकाल

* सत्यजित तांबेनी भाजपात प्रवेश करावा; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाचं मोठं वक्तव्य, मी तर अपक्ष उमेदवार अन् अपक्षच राहिन ; सत्यजीत तांबे यांची मतदानानंतरची प्रतिक्रिया 

* प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान, पहिला क्रमांक उत्तराखंडच्या रथाला तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ 

* राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप.. हिमवर्षाव सुरु असताना वादळी भाषण, शरद पवारांच्या भर पावसातील भाषणासोबत होतेय तुलना 

* Kasaba Bypoll Election : पोटनिवडणूकीसाठी मनसे देखील इच्छुक

* रियल रँचो सोनम वांगचुक यांची 'Save Ladakh' मोहीम, उपोषणाचा पाचवा दिवस, देशभरात सामाजिक कार्यकर्त्यांकडून एक दिवसीय उपोषण करुन पाठिंबा 

* हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला; आरोपांनंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर 

* प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर  हल्ला

* पाकिस्तानातील पेशावरमध्ये नमाज सुरु असताना मशिदीत बॉम्बस्फोट; 28 जणांचा मृत्यू, 150 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती 

* अदानींच्या कंपनीत IHC कंपनी करणार 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक, अदानी एंटरप्राइजमध्ये एफपीओद्वारे होणार गुंतवणूक

* 'पठाण' चित्रपटाने जगभरात 5 दिवसात 500 कोटींचा गल्ला केला पार, भारतात 335 कोटी तर परदेशात 207 कोटींची केली कमाई  

* काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टी.. जम्मू आणि काश्मीरला जोडणारे महामार्ग ठप्प, काश्मीर खोऱ्यातील या हिमवर्षावामुळे तापमान उणे दोन (-2) अंशापर्यंत घसरलं

* बीबीसी डॉक्युमेंटरीवरील केंद्राच्या बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान, 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

* काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचा आज समारोप: शेर-ए-काश्मीर मैदानात काँग्रेसची सभा, कार्यक्रमात 21 पक्षांना होते निमंत्रण 

* शेअर बाजार: सेन्सेक्स - 59,500.41 (169+), निफ्टी - 17,648.95 (44.60+) 

* फ्रांसमधील Science Po या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांवर ChatGPT च्या वापरास बंदी, ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतील व मूळ डेटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे दिले कारण

* उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर; खासदार अनिल देसाईंची माहिती; म्हणाले, “आम्ही…”

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षानाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

* महाराष्ट्राच्या चित्ररथाचा द्वितीय क्रमांक; कर्तव्यपथावर सादर केला होता ‘शक्तीपीठ आणि नारीशक्ती’चा देखावा

* कॅमेऱ्याची फिकीर कुणाला ? देशाभिमानच सर्वोच्च! राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीत सुरू होताच युवक : राहुल गांधींच्या सभेनंतर राष्ट्रगीतादरम्यान दिसलं युवकाचं राष्ट्रप्रेम!

पेशावरमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत भीषण स्फोट, ९० जण जखमी : पाकिस्तानमधील पेशावर येथील मशिदीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

* बारामतीतील चांदगुडेवाडीत वाळू माफियांवर कारवाई, कऱ्हा नदीपात्रात वाळू उपसा : या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून वाळू, जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर ट्राॅली असा ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

* पुणे : नाना पेठेत तरुणाचा खून करणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आतापर्यंत शहरातील आठ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

* नागपूर: मेळघाटात दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन; आठ नवीन प्रजातीची नोंद

* रानपिंगळ्याचे दर्शन तसे दुर्मिळच, मेळघाटात तो कधीतरी दिसतो. पक्षी सर्वेक्षणादरम्यान मेळघाटात तो दिसला आणि पक्षी अभ्यासक आनंदले.

* निवडणूक ३३ जागांवर, मात्र सर्व ठिकाणी पक्षाने दिला एकच उमेदवार, वाचा पाकिस्तानमधील या अजब निवडणूकीबद्दल…

* पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झालेले इम्रान खान मार्च महिन्यात देशात होणाऱ्या पोटनिवडुकीत सर्व ३३ जागांवर निवडणूक लढणार आहेत.

* नागपूर : आकाशात विमान असताना प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला अन…

* नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न प्रवाशाकडून करण्यात आला. विमानातील कर्मयाऱ्यांच्या लक्षात येताच ते थांबवण्यात आले

* शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘पठाण’ आता ओटीटीवरही होणार प्रदर्शित,

* मुंबई : संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन संगीतकार घाणेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

* नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

* इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

* नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

* इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

* ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

* “भारत जोडो यात्रेत सारखी गुडघेदुखी होत होती, पण एक दिवशी चिमुकली भेटली अन् तिने…”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमध्ये समारोप झाला.

 * IND vs NZ: सूर्याने सीएम योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट; मुख्यमंत्र्यांनी SKY सोबतचा फोटो शेअर करताना लिहिला खास संदेश

* CM Yogi Adityanath’s Message: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांनी सूर्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि एक खास संदेश लिहिला, जो व्हायरल होत आहे

* कर्करोगाने पतीला तर सर्पदंशाने मुलाला गमावले; जगाने दुर्लक्षित केलेल्या आईच्या लेकीने टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

* उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर; खासदार अनिल देसाईंची माहिती; म्हणाले, “आम्ही…”

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाच नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

* “संजय राऊत हा असा व्यक्ती आहे, की राहुल गांधींचा आणि शरद पवारांचा फोटो शिवसेना भवनात ” संजय शिरसाटांचं टीकास्त्र.!

* दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण ; अंतरिम अहवाल मंजुरीसाठी मुख्यालयाकडे

* मुंबई: वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात शिंदे गटात,

वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक ऍड.संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.

* IND vs NZ: सामन्यापेक्षा गाजली लखनऊची खेळपट्टी! हार्दिकनंतर टीम इंडियाच्या बॉलिंग प्रशिक्षकाची आगपाखड, क्युरेटर वादाच्या भोवऱ्यात

* लखनऊच्या खेळपट्टीवर सातत्याने टीका होत आहे. सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या एकानाच्या खेळपट्टीवर निराश दिसला. त्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक देखील भडकले..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या