💥जिंतूर तालुक्यातील इटोली जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी...!


💥याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले💥


जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१२ जानेवारी) - तालुक्यातील इटोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.१२ जानेवारी २०२३ रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले या जयंतीनिमित्ताने शाळेतील विद्यार्थीनी सिद्धी मेनकुदळे व निकिता हांडगे यांनी राजमाता जिजाऊ यांची हुबेहूब वेशभूषा साकारत सर्व उपस्थितांची मने जिंकली.


     या जयंतीनिमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आसाराम घुगे, सुर्यकांत घुगे (माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष), पिंन्टू घुगे (ग्रामपंचायत सदस्य), शिक्षणप्रेमी गजानन घुगे, व शोभाताई उन्हाळे आदि प्रमुख अतिथी उपस्थित होते यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर जुमडे, सहशिक्षक भास्कर चव्हाण, परमेश्वर मेनकुदळे, गजानन काळे, मंगेश मेश्राम, कौशल्या नागरगोजे,व मीरा दाडगे आदि शिक्षिक बांधवांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.   परमेश्वर मेनकुदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर भास्कर चव्हाण यांनी उपस्थितांचे शब्द सुमनानाने शाळेच्यावतीने मनस्वी आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या