💥दर्पन दिन विशेष : भ्रष्ट बेईमानांच्या हातातील कठपुतळ्या झालेल्या झुजऱ्यांना आज दर्पण अर्थात आरसा दाखवण्याची वेळ..!


💥भारतात निर्भिड व जनहीतवादी पत्रकारीतेची खरी सुरुवात 'मुकनायक'च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली💥


परखड सत्य - चौधरी दिनेश (रणजीत)

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजात प्रबोधन व्हावे या उद्देशाने शुक्रवार दि.०६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून दि.०६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'मराठी पत्रकार दिन' म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तत्कालीन दब्रिटिश राज्यकर्त्यांना देखील कळावे म्हणून त्याकाळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्राताचा एक स्तंभ मातृभाषा मराठीसह एक स्तंभ इंग्रजीत देखील छापून जनसामान्यांच्या भावना त्यांना कळाव्यात या उद्देश डोळ्या समोर ठेवल्याचे निदर्शनास येते.


जनहीतवादी पत्रकारीतेचा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ब्रिटिश काळात आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' अर्थात आरसा या वृत्तपत्राची सुरुवात करुन ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक' हे वृत्तपत्र इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केले 'मूकनायक' हे मराठी भाषेतील एक पाक्षिक होते ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे निर्भिड व वास्तववादी लोकहीतवादी पत्रकारीतेची खरी सुरुवात जर कोणी केली असेल तर ती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यामुळे भारतात खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली यात तिळमात्र शंका नाही.

 आज शुक्रवार दि.०६ जानेवारी रोजी 'दर्पण दिन' असल्यामुळे या दर्पण दिनाचे औचित्य साधून जनहीताशी काडीमोड करून संधीसाधू पत्रकारीतेचा वसा घेऊन समाजात वावरणाऱ्या व प्रशासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रातील भ्रष्ट बेईमान समाजकंठक माफिया तस्करशाहीच्या हातातील कठपुतळ्या झालेल्या झुजऱ्यांना आज दर्पण अर्थात आरसा दाखवण्याची वेळ नक्कीच आलेली आहे पत्रकार क्षेत्रात वावरतांना निर्भिडपणे वास्तववादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना भ्रष्ट बेईमान नौकरशहांसह माफिया तस्कर समाजकंठक प्रवृत्तींच्या प्रचंड रोषाला तर बळी जावेच लागते त्याही पेक्षा दुर्दैवी आणि गंभीर बाब म्हणजे भ्रष्ट बेईमान नौकरशहांसह माफिया तस्कर समाजकंठकांपुढे मुजरा करीत रोटी बोटी अन् एका चपटीची व्यवस्था करून घेणाऱ्या संधीसाधू हुजऱ्यांच्याही कुटील कारस्थांना तोंड द्यावे लागते त्यामुळे 'दर्पण दिनाच्या' दिवशी एकत्रित येऊन स्वतःच्याच हाताने स्वतःचेच सत्कार सोहळे करून घेणाऱ्यांनी आता एक गोष्ट निश्चितच लक्षात घ्यायला हवी की जनहीताशी बांधिलकी जोपासत दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि करोडो दिन दुबळ्या वंचित सोशीत घटकांना आपल्या हातातील लेखनअस्त्राच्या बळावर न्याय मिळवून देणाऱ्या  विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत वास्तववादी लिखान करणाऱ्या निर्भिड पत्रकारांना कधीही सन्मानाची आवश्यकता भासत नाही कारण त्या पत्रकाराने निस्वार्थपणे केलेल्या वास्तववादी लिखानामुळे एकाला जरी न्याय मिळाला तरी त्याच्या चेहऱ्यावरील समाधानच त्या पत्रकाराचा खऱ्या अर्थाने सन्मान असतो.....

        " वृत्तपत्र क्षेत्रात वावरणाऱ्या संधीसाधू पोटभरुंच्या पोटात जनहीतवादी पत्रकारीता करणाऱ्या निर्भिड पत्रकारांची वास्तववादी पत्रकारीता बघून आता अक्षरशः कळ उठू लागली.....

अन् वेळोवेळी रंग बदलणाऱ्या नटरंगी संधीसाधू गुलामांच्या  हातातली लेखणी भ्रष्ट राजकारणी/माफिया समाजकंठक बेईमानांच्या इशाऱ्यावर एखाद्या बारबाले प्रमाणे रात्रंदिवस नाचू लागली...

 इंग्रजी सत्तेला दर्पण दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दर्पणकारांच्या दर्पणात आता तथाकथित हुजऱ्या लेखन सम्राटांची प्रतिमा आता बघा कशी कलंकीत होतांना दिसू लागली.....कलंकीत होतांना दिसू लागू....कलंकीत होतांना दिसू लागली......"

- चौधरी दिनेश (रणजीत)

[वृत्तपत्र क्षेत्राची आज खऱ्या अर्थाने अशी अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे...]टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या