💥मलकापूर येथील असंख्य युवकांचा वाल्मिक आण्णा कराड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश...!


💥यावेळी वाल्मिक आण्णा कराड यांनी राष्ट्रवादी पक्षाचा गमजा व पुष्पहार देऊन पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार केला💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील मलकापूर  गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी दि.२२ जानेवारी  रोजी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

परळी तालुक्यातील मलकापुर येथील  भगवान माणिकराव गित्ते, बळीराम मानाजी गित्ते, भास्कर विठ्ठल गित्ते विकास गित्ते माऊली प्रभू गित्ते, उमेश गित्ते,  सोमनाथ गित्ते, अमोल गित्ते, गजानन गित्ते व आदींनी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवश केला. वाल्मिक आण्णा कराड यांनी राष्ट्रवादी पक्षाचा गमजा व पुष्पहार देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते श्रीकृष्ण (भावड्या) कराड, संग्राम गित्ते, कल्याण गित्ते, संतोष गित्ते व इतर उपस्थित होते. मलकापूर येथील भगवान माणिकराव गीते म्हणाले की, मी व गावकरी आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करू आसे सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या