💥पुर्णेतील शासकीय गायरान जमीनीवर होणार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिस स्थानकाची भव्य इमारत....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ शासकीय मोजनीसह अतिक्रमणा संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश💥

परभणी/पुर्णा (दि.११ जानेवारी) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा शहरातील कोट्यावधी रुपयांच्या शासकीय गायरान जमिनीवरील अनाधिकृत बांधकामांसह बेकायदेशीर अतिक्रमणांवर लवकरच जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून हातोडा चालण्याचे संकेत मिळत असून तसे आदेश देखील जिल्हाधिकारी दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय यांना प्राप्त झाले असून या आदेशात या सर्वे नंबर १४ च्या शासकीय गायरान जमीनीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्याचे आदेश देण्यात आले असले तरी सन्माननीय जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशानंतर संबंधितांनी काय कारवाई केली हे गुलदस्त्यातच असल्याचे निदर्शनास येत आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा शहरात स.नं.१५८ एकून ३९.३० हेक्टर आर जमीन ७/१२ प्रमाणे आहे त्यापैकी काही जमीन  शासकीय कार्यालयांना प्रदान करण्यात आली आहे तसेच मौ.पुर्णा येथिल शासकुय सर्वे नंबर १४ च्या ७/१२ वर एकून क्षेत्र १९.१४ हेक्टर आर आहे यामध्ये काही जमीनीवर बोगस कागदपत्रांच्या आधारे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन काही जमीनीवर पक्की बांधकामांसह अतिक्रमण करण्यात आली आहे व काही जमीन शासकीय कार्यालयांना प्रदान करण्यात आलेली आहे सदरील जागेवर बाकी असलेल्या जागेचा तात्काळ सर्वे करून ही जागा पुर्णेतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह भव्य पोलिस स्थानकाच्या इमारतीसाठी देण्या संदर्भात सन्माननीय जिल्हाधिकिरी आंचल गोयल यांनी जा.क्र.२०२९/आरबी/डेस्क/एलएनडी-१/कावी-४१२ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी दि.१२/१२/२०२२ अनुसार पुर्णा भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक यांच्यासह जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख परभणी,उपविभागीय अधिकारी गंगाखेड माहिती व योग्य त्या कारवाईस्तव,तहसिलदार तहसिल कार्यालय पुर्णा यांच्या नावाने जारी करुन या आदेशात तहसिलदार टेमकर यांना उपअधिक्षक भुमी अभिलेख पुर्णा यांचेशी संपर्क करुन या प्रकरणी कारवाई तातडीने पुर्ण करावी व केलेल्या कारवाई बाबत अहवाल तात्काळ  जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे म्हटले आहे परंतु या संदर्भात पुढील कारवाई काय झाली हे गुलदस्त्यातच असले तरीही या सर्वे नं.१४ या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय गायरान जमीनीवरील  अनाधिकृत बांधकामांसह बेकायदेशीर अतिक्रमण उध्वस्त होऊन भव्य उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या सुसज्ज इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या कर्तव्यकठोर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उचललेले हे अत्यंत महत्वपुर्ण व कठोर पाऊल असल्याचे दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या