💥ब्रेकींग न्यूज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी...!


💥केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयात आज सकाळी तब्बल तीन वेळा धमकीचा फोन आला💥

✍️ मोहन चौकेकर 

आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज शनिवार दि.14 जानेवारी 2023 रोजी सकाळी तीन वेळेस फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन अधिक तपास करत आहे. हा प्रकार झाल्यावर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

*आज सकाळी नेमकं काय घडलं..?

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आज सकाळी तब्बल तीन वेळा धमकीचा फोन आला. या तीनदा आलेल्या धमक्यांच्या फोनमध्ये गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं कळत आहे. प्राप्त माहीतीनुसार, नागपुरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आल्याचं समजत आहे.

 मिळालेल्या माहीतीनुसार, "नितीन गडकरी यांना जीवे मारू", अशा आशयाचे हे धमकीचे कॉल होते. एवढंच नव्हे तर धमकी देणाऱ्या व्यक्तीने 'दाऊद' असा शब्द उच्चारत "आम्हाला खंडणी दिली नाही तर गडकरींना जीवे मारू", अशी धमकी दिली असल्याचं कळालं आहे. काही वेळेच्या अंतराने एकामागून एक तीन वेळेस धमकीचे फोन आले होते.

आता सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. हे धमकीचे फोन सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता आले होते. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत. कर्नाटकमधून हे फोन आल्याचा अंदाज व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या