💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारात पालम तालुक्यातील फरकंडा गावच्या डिग्रस बंधाराग्रस्त शेतकऱ्यांच्या मावेजा प्रश्न...!


💥शिवसेना संपर्कप्रमुख मा.खा.सुरेश जाधव यांनी बंधाराग्रस्त शेतकऱ्यांच्या मावेजा प्रश्नी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट💥

परभणी (दि.15 जानेवारी) - जिल्ह्यातल्या पालम तालक्यातील फरकंडा येथील डिग्रस बंधाऱ्याच्या बुडित क्षेत्राचा मावेजापासून अद्यापही काही शेतकरी वंचित आहेत. अशा उर्वरीत शेतक-यांना मावेजा देण्यात यावा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. 

फरकंडा येथील उर्वरित शेतकरी मावेजाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळून देऊ असे अश्वासन सुरेशराव जाधव यांनी फरकंडा येथील उर्वरित शेतकऱ्यांना दिले या मागण्याकडे विशेष लक्ष देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी खासदार तथा संपर्कप्रमुख सुरेश जाधव पाटील यांनी रूरल एक्सप्रेसशी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या