💥चिखली मेडिकल असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनी रक्तदान शिबिर संपन्न....!


💥या शिबिरासाठी शासकीय रक्तपेढी बुलढाणा व जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य लाभले💥

✍️ मोहन चौकेकर 

 चिखली (दि.२९ जानेवारी) -  प्रजासत्ताक दिनाचे साधून चिखली मेडिकल असोसिएशनच्या वतीने दि.२६ जानेवारी रोजी स्थानिक मेडिकल हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी विदर्भात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा केला जाऊ शकत नसल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकचे प्रमुख हरिश वरभे यांच्याकडून कळाली आहे,गेल्या काही वर्षांत विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिरे आयोजित केले जात असले तरी त्यातून पाहिजे त्या प्रमाणात रक्तदान होत नाही.

आपल्या देशात १४४ कोटी लोकसंख्या असूनही केवळ १ कोटी २० लाख लिटर रक्त पुरवठा केला जात असून गेल्या वर्षी ७४ लाख युनिट रक्त उपलब्ध झालेले होते,आवश्यकतेनुसार ४० टक्के रक्ताची कमी होती रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के असून भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात तर विदर्भात १० हजार लिटर रक्ताची आवश्कता आहे मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये रक्ताची आवश्यकता असताना त्यांच्याकडे तेवढा साठा उपलब्ध नसल्याचे एका सर्वेक्षणानुसार लक्षात आले आहे. काही खाजगी रक्तपेढींमध्ये जास्तीचे पैसे घेऊन रक्त दिले जात असल्याच्या तक्रारी तक्रारी देखील दबक्या आवाजात येत असतात

साधारणत १८ ते ६५ या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येऊ शकते. ज्यांचे वजन साधारणत ७४ किलो आहे त्यांच्या शरिरात ५ लिटर रक्त असल्याचे सांगितले जाते, आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही,शासकीय पातळीवर रक्तदान संदर्भात जागृती केली जात असली तरी त्या प्रमाणात रक्तदाते मात्र समोर येत नाहीत, एका व्यक्तीने एकदा रक्त दिल्यानंतर साधारणत तीन महिन्यांनी रक्त देणे आवश्यक आहे, रक्तदान करताना शरिरात हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक असणे गरजेचे असते. रक्तदानानंतर शरिरात रक्ताची पूर्ती २४ तासात होत असते रक्तदाताच्या शरीरातून ३५० किंवा ४५० मि.लि. पर्यंत रक्त घेऊ शकतात, जे नेहमीच रक्तदान करतात त्यांना मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि रक्तचापसारखे आजार होत नाही, असेही तज्ञ डॉक्टरांचे मत आहे .

 भारतात २ हजार ७५० रक्तपेढय़ा आहेत, तर महाराष्ट्रात २८२ रक्तपेढ्या असून या माध्यमातून  रुग्णांना रक्तपुरवठा केला जात असला तरी अजून बरीच आवश्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन चिखली मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले,या शिबिरासाठी शासकीय रक्तपेढी बुलढाणा व जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य लाभले,डॉ पंढरी इंगळे  व डॉ योगेश काळे यांनी विशेष परिश्रम घेतले,याप्रसंगी बुलढाणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी तथा रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांच्या सह ७५ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला  याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक  विध्याधरजी महाले,हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा वृषाली ताई बोंद्रे,माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे,रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील,मनसे जिल्हाध्यक्ष बंडू बरबडे,प्रा डॉ निलेश गावंडे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली ,यावेळी डॉ डॅा प्रतापसिंग राजपुत डॅा प्रतापसिंग परिहार डॅा सराफ डॅा प्रकाश शिगंणे चिखली मेडीकल अशोशियनचे  अध्यक्ष डॉ रविंद्र कळमस्कर, उपाध्यक्ष डॉ योगेश काळे, सचिव डॅा चेतन समदाणी उपध्यक्षा डॅा योगीता तायडे डॉ सुहास तायडे,डॉ रामेश्वर दळवी,डॉ पानगोळे,डॉ खेडेकर,डॉ योगिता तायडे सहसचिव डॉ पंढरी इंगळे,कोषाध्यक्ष डॉ नन्दकिशोर जाधव,डॉ मनिष काळे,डॉ चित्तरंजन रिंढे,डॉ अवचार,डॉ संदीप म्हस्के,डॉ रोहित देशपांडे, डॉ जवंजाळ, डॅा सुहास खेडेकर डॅा पंकज शेटे डॉ लोखंडे, डॅा गणेश हारणे डॅा भोलानेचौकेकर  डॅा गिरी केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील  तायडे,विनोद नागवाणी,बद्री पानगोळे,जयंत शर्मा,सुनील पारस्कर,राहुल दवे,भारत खंडागळे यांच्यासह बहुतांश डॉक्टर व केमिस्ट सदस्य उपस्थित होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या