💥बौद्ध धम्मपद यात्रेला गंगाखेड येथून ५ हजार बौद्ध उपासक जाणार....!


💥गंगाखेड येथे आज गुरुवार दि.०५ जानेवारी रोजी आयोजित बैठकीत निर्धार💥 

गंगाखेड (दि.05 जानेवारी) - परभणी ते चैत्यभूमी (दादर) या दरम्यान दि.१७ जानेवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजित बौद्ध धम्म पदयात्रेसाठी  गंगाखेड शहर तालुका व परिसरातून (दि.१७) जानेवारी रोजी किमान ५ हजार बौद्ध उपासक जाणार असल्याचा निर्धार आज गुरुवार दि.५ जानेवारी २०२३ रोजी गंगाखेड येथील आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आला.

      गुरुवारी डॉ आंबेडकर नगरातील ॲड.गौतमदादा भालेराव सभागृहात दुपारी २ वाजता डॉ.आंबेडकर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. सिध्दार्थ भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंतभैय्या भालेराव यांच्या संयोजनातून बौद्ध उपासकांची बैठक पार पडली. यासाठी परभणीहून निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, प्रा.डॉ. भीमराव खाडे, डॉ.भगवान धुतमल व भगवान जगताप यांची उपस्थिती होती. 

       डॉ.गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सिने अभिनेत्री डॉ.गगन मलिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा पदयात्रेचे निमंत्रक डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे व मुख्य समन्वयक लोकनेते विजय वाकोडे यांच्या मार्गदर्शनातून दि.१७ जानेवारी रोजी परभणीत आयोजित ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रेस गंगाखेड शहर तालुका व परिसरातून किमान ५ हजार बौद्ध उपासक जाण्यासाठी नियोजनात्मक चर्चा करण्यात आली. लवकरच तालुक्यासाठी संयोजन समिती स्थापित करण्यात येत असून व्यापक स्वरूपात समाज बांधवांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. घरोघरी, गल्लो- गल्ली पदयात्रेच्या निमित्ताने जनजागृती करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

       याप्रसंगी डॉ.सिद्धार्थ भालेराव, डॉ.प्रकाश डाके, प्रा.डॉ.भीमराव खाडे, डॉ.भगवान धुतमल, यशवंतभैय्या भालेराव यांचेसह बौद्धाचार्य नवनाथ साळवे, बौद्धाचार्य गुणवंत कांबळे, ॲड.राजू गरुड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक घोबाळे, प्राचार्य संजय सावंत, ॲड.महावीरराजे भालेराव यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार प्रमोद साळवे यांनी केले......


फोटो ओळी 

 गंगाखेड -

      शहरात गुरुवारी परभणीच्या बौद्ध धम्म पदयात्रेच्या निमित्ताने नियोजनात्मक बैठक पार पडली. याप्रसंगी डॉ. सिद्धार्थ भालेराव, डॉ.प्रकाश डाके, प्रा.डॉ.भीमराव खाडे, डॉ.भगवान धुतमल, डॉ भगवान जगताप, यशवंतभैय्या भालेराव आदींसह उपस्थित शहर, तालुका व परिसरातील समाजबांधव दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या