💥सामाजिक ज्ञानासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक - प्रा.डॉ. पाईकराव


💥राष्ट्रीय सेवा योजनेच्या गोविंदपुर येथे संपन्न झालेल्या शिबीराच्या समारोप प्रसंगी ते म्हणाले💥

पूर्णा (जं) प्रतिनिधी -  सामाजिक ज्ञानासाठी राष्ट्रीय सेवा योजना आवश्यक  असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. दिलीप पाईकराव यांनी येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे गोविंदपुर येथे संपन्न झालेल्या शिबीराच्या समारोप प्रसंगी केले.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे सात दिवसांचे शिबिर येथे आयोजित करण्यात आले होते. 

या शिबीरमध्ये रक्तदान शिबीर ,पशु तपासनीस शिबीर , ग्राम स्वच्छता आदी उपकृत कार्यक्रम राबविण्यात आले. पुढे बोलताना डॉ. पाईकराव म्हणाले की स्वयंसेवकानी समाजामध्ये वावरतांना सामाजिक ज्ञानाचा आपल्या आयुष्यात खूप फायदा होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रामेश्वर पवार म्हणाले की या शिबिरातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला पाहिजे. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर सुर्यवंशी यांनी सात दिवसात केलेल्या कामाचे अहवाल वाचन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. संतोष कु-हे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. डॉ. दिपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. पी. डी. सुर्यवंशी यांनी मानले. यावेळी विचारपीठावर प्रा.डॉ.शेख सर, प्रा.डॉ. सुरेखा भोसले, प्रा.डॉ. विजय भोपाळे,  सरपंच नितीन लोखंडे, उपसरपंच रंगनाथ शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष भुजंगराव लोखंडे ग्रामसेवक सौ. माणिकताई सुरेवाड पोलिस पाटील पंकज लोखंडे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या