💥परभणी जिल्ह्यात नियमबाह्य पध्दतीने चालणारी असंख्य वाहन ठरताय अपघाताला कारण...!


💥पुर्णा तालुका आघाडीवर : पुर्णा-ताडकळस/पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर वाढले अपघातांचे प्रमाण💥

💥बेकादेशी गौण खनिज अवैध रेती/मुरुम/खडी/माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत आहेत मोठ्या प्रमाणात अपघात💥


परभणी/पुर्णा (दि.१९ जानेवारी) - परभणी जिल्ह्यात  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अकार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे असंख्य कालबाह्य झालेली वाहन ज्यात टिप्पर/हायवा/ट्रक आदींसह प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बसेस,जिप/कार राज्य महामार्गांवर धावत असल्यामुळे अशी वाहन अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे या वाहनांमध्ये अवैध गौण खनिज अर्थात रेती/मुरुम/खडी/माती वाहतूक करणाऱ्या जड वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून अश्या वाहणांचे स्टेरींग सर्रास अर्धवट शिकाऊ विदाऊट लायसंन्स धारक चालकांच्या हातात असल्यामुळे ही चालक मंडळी मालकांच्या इशाऱ्यावर गौण खनिजाची चोरटी वाहतूक करतांना राज्य महामार्गांसह गाव रस्त्यांवर देखील प्रचंड वेगाने वाहन पळवत असल्यामुळेच अपघातांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येत आहे

असाच एक गंभीर व हृदयविदारक अपघात पुर्णा तालुक्यातील मौ.कानखेड शिवारातील रिल्याबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखान्यासमोर काल बुधवार दि.१८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास घडला असून सुसाट वेगाने धावणाऱ्या टिप्पर क्रमांक एम.एच.४८ डी २३४७ च्या टिप्पर चालकाने रिलायबल कंपनीतील कामावर आलेल्या ५५ वर्षीय गणपत राघोजी खाडे रा.एरंडेश्वर ता.पुर्णा या इसमास उडवल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे टिप्पर चालकाने मुरुमाने भरलेल्या टिप्परासह तात्काळ पलायन केले या घटने संदर्भात मयताची मुलगी गिता खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुर्णा पोलिस स्थानकात गुनौहा दाखल करण्यात आला आहे.

 परभणी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अकार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात देखील कालबाह्य झालेली असंख्य वाहन प्रवासी वाहतुकीसह असंख्य जड वाहन बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचे निदर्शनास येत आहे पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड,पुर्णा-ताडकळस,पुर्णा-परभणी राज्य महामार्गांवर सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर मागील आठ दिवसात तिन ते चार अपघात झाले असून यात एकास आपला जिव गमवावा लागला तर दोन जन गंभीर जख्मी झाल्याच्या घटना ताज्याच असतांना काल कानखेड शिवारात एकास आपला जिव गमवावा लागला तर आज देखील पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील नऱ्हापूर जवळ एका दुचाकीस्वाराला कारणे उडवल्याची घटना घडली या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे समजते महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाने राज्यात सर्वत्र मागील दि.१० डिसेंबर २०२२ ते ३१ मे २०२३ टू व्हिलर,थ्री व्हिलर,फोर व्हिलर,टेम्पो,प्रवासी वाहतूक करणारे लक्झरी बस तसेच इतर जड वाहतूक करणारी अवजड वाहनांवर कडक कारवाई करुन जास्तीतजास्त दंड वसूली करण्याचा कार्यक्रम जाहीर केला या अंतर्गत प्रामुख्याने लायसन्स नसने,हेल्मेटचा वापर न करणे,ट्रिपल सीट संदर्भात १ हजार/ १० हजार ते २५ हजार रुपये दंडात्मक कारवाईसह १५ वर्षाच्यावर झालेल्या कालबाह्य वाहनांवर प्रतीरोज ५० रुपये अश्या पध्दतीने दंडात्मक कारवाई करुन रि-रजिस्ट्रेशन करणे अश्या कारवाया कलमानुसार करण्याचे आदेश असतांना व राज्यात सर्वत्र कारवाया होत असतांना परभणी जिल्ह्यात मात्र उप प्रादेशिक परिवहन मंडळातील अधिकारी उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या