💥मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त बोरी येथे पशुपालकांचे स्नेहमिलन....!


💥जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.12 जानेवारी): मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना गुरुवारी पशुपालकांचे स्नेहमिलन व हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

बोरीचे सरपंच प्रदिपराव चौधरी अध्यक्षस्थानी तर अमृतराव चौधरी, इमरान खान, पवन ओझा, प्रतिक देशमुख, बालाजी अंभोरे, अक्षय अंभोरे, विष्णू अंभोरे आदींसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.यावेळी लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. बि. ए.जावळे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. केशव सांगळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. कादरी, श्री. फड, राजेश पंडित, प्रकाश गारूडी, भागवत कंठाळे, होळपाते, मो. अन्सारी, सय्यद अल्ताफ, रामेश्वर शिंपले, विष्णू राऊत, रमेश घोडे, जव्हार इ. कर्मचारी व सेवादाते उपसि्थत होते. डॉ. बी. ए जावळे व डॉ. के.डी. सांगळे यांनी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ लम्पी रोग नियंत्रण, स्वच्छ दुग्ध उत्पादन, म्हैस व्यवस्थापन लसीकरणाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शाहेद देशमुख व सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या