💥पुर्णेत धनगर समाज बांधवांनी केला जातीयवादी खासदार सुजय विखे यांचा जाहीर निषेध....!


💥भाजपा खा.सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्यास केला विरोध💥

परभणी/पुर्णा (दि.०५ जानेवारी) - अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्यास विरोध केल्यामुळे आज गुरुवार दि.०५ जानेवारी २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांनी जातीयवादी खासदार विखे यांचा जाहीर निषेध करीत पुर्णेच्या तहसिलदार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून खा.विखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली.


खा.सुजय विखे यांच्या निषेधार्थ धनगर समाज बांधवांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनावर ॲड.विजयकुमार साखरे,बालाजीराव वैद्य,विश्वनाथ होळकर,बंडुअप्पा बनसोडे,प्रताप बखाल,जगन्नाथ रेनगडे,नवनाथ बखाल,गिन्यानदेव वैद्य,सदाशिव सौदागर,रविद्र वैद्य,जगन्नाथ शेळके,गजानन माने,राममहाराज बनसोडे,बालाजी पिसाळ आदींच्या स्वाक्षरी आहेत......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या