💥परभणी जिल्ह्यातील नव व्यवसायीकांसाठी ‘ईज ऑफ ड्युईंग बिझनेस’ बाबत कार्यशाळा संपन्न...!


💥कार्यशाळेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.27 जानेवारी) :  परभणी जिल्ह्यातील विविध नव्याने व्यवसाय करू इच्छुकांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच शहरात ‘ईज ऑफ ड्युईंग बिझनेस’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यशाळेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हणबर, अग्रणी बँकेचे सुनिल हट्टेकर, मुंबईतील उद्योग संचालनालयाच्या मैत्री कक्षाचे कृष्णा कोतवाल, श्रीमती प्रियंका मेहता, मराविविकंचे अधीक्षक अभियंता श्री. चौधरी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे श्री. देशमुख, उद्योजक रामेश्वर राठी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुरेश पवार यावेळी उपसि्थत होते.

उद्योगांना सर्व मंजुरी एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी एक खिडकी योजना राबविणे आवश्यक असून, परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी मैत्री कक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे उद्योगांना परवानग्या मिळण्यासाठी मदत होईल. तेलंगणा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात असे मैत्री कक्ष स्थापन आहेत. त्याच धर्तीवर आपल्याही राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मैत्री कक्ष स्थापन करावे लागणार असून, या कक्षात शासनाने तज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी, असे महाव्यवस्थापक हणबर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने त्यांच्या विभागाच्या असलेल्या सर्व योजनांची माहिती या कार्यशाळेत दिली. तसेच उद्योगांना लागणा-या परवानग्याबाबत मार्गदर्शन केले.व उद्योजकास काही अडचण असल्यास 875476326 या निशुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता श्री. चौधरी यांनी केले.

राज्यस्तरावर 2014-15 पासून असलेल्या मैत्री कक्षासंदर्भातील पर्यावरण, कामगार, नगर विकास, उर्जा, महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना लोकसेवा हक्क अधिनियम 2015 लागू असल्यामुळे सर्व विभागांनी आपल्याकडील अर्जाचा निपटारा वेळेत करावा. तसेच परभणीत जिल्हास्तरावर राज्य शासनाप्रमाणे मैत्री कक्ष स्थापन केल्यामुळे सर्व उद्योजकांच्या अडचणी लवकर सुटतील, असे कृष्णा कोतवाल यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल व महाव्यवस्थापक पी.डी.हणबर यांचे अभिनंदन केले.  

मैत्री पोर्टलवरील पर्यावरण, वित्त, कामगार विभाग बाष्पके, नगर विकास विभाग, उर्जा विभाग, महसूल विभाग, या विभागासंबंधी मैत्रीच्या सेवा सविस्तरपणे प्रियंका मेहता यांनी सांगितल्या. तसेच उद्योग विभागाच्या साप्रोयो, आयटी, एमएसएमई, इलेक्ट्रॉनिक्स यांच्या धोरणाबाबत मार्गदर्शन केले. सीएमईजीपीचे लाभार्थी व यशस्वी उद्योजक,श्री. शिवणकर, श्री.साई उद्योग गुळ यांचे स्वागत करण्यात आले. 

या कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँकाचे क्षेत्रीय व्यवस्थापक, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटनेचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, औद्योगिक वसाहतीचे प्रतिनिधी, निर्यात करणारे उद्योग घटक, क्लस्टरचे उद्योग घटक तसेच सीएमईजीपी, पीएमईजीपीचे यशस्वी उद्योजक, चार्टट अकाउंटंट आदी उपस्थित होते प्रारंभी जिल्हा उद्योग निरीक्षक व व्यवस्थापक आर. एस. पत्की यांनी सर्व उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या