💥तळमळीने सामाजिक बांधिलकी जपणारा खराखुरा 'निस्वार्थ सेवाव्रती' : डॉ.संतोष मुंडे


💥उद्या मंगळवार दि.०३ जानेवारी रोजी डॉ.संतोष मुंडे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा💥

      समाजकारण व राजकारणात चांगल्या युवकांनी यायला हवे असे नेहमी म्हटले जाते.काही युवक आहेत जे की अतिशय तळमळीने समाजकार्य करतात.परळी तालुक्यातील डॉ .संतोष मुंडे हे याच तळमळीने सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा करीत आहेत.आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिव्यांगाचा कैवारी बनलेले विविध आरोग्यविषयक, सामाजिक  उपक्रम व लढा देत विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंची तळमळीने निस्वार्थ सेवा करणारा खराखुरा सेवाव्रती म्हणजे डॉ.संतोष मुंडे हे आहेत.उद्या मंगळवार दि.०३ जानेवारी रोजी डॉ.संतोष मुंडे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा.

        संपूर्ण महाराष्ट्रात डॉ.संतोष मुंडे हे परळी तालुक्यातील एक वलयांकित नाव बनलेले आहे.पहिल्यापासून समाजकारण करण्याची आवड असल्याने समाजकारण करत असतानाच, राजकारणाकडे लक्ष केंद्रित झाले.ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्यास सुरुवात केली. समाजकारण व राजकारण या दोन्हीची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून रुग्ण सेवा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबरीने सर्वात उल्लेखनीय व पूण्याचे काम त्यांनी हाती घेतले.समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत प्रसंगी पदरमोड करून दिव्यांगासाठी अहोरात्र काम करत आहेत.

             २०१८ साली डॉ. संतोष मुंडे  यांनी ना. धनंजय मुंडे आरोग्यमित्र योजना  सुरू केली.या माध्यमातून महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे  काम सुरू केले. आरोग्य मित्र योजनेमार्फत गरजू पेशंटला वेळोवेळी मदत करणे, बेडच्या आवश्यकता असेल तर डॉक्टरांशी बोलणे, ब्लड ची आवश्यकता असेल तर डॉक्टरांशी बोलणे आदी कामे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू झाली.महाराष्ट्रातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी डॉ.संतोष मुंडे हे सतत कार्यरत असतात दिव्यांग व गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य हे अद्वितीय आहे.डॉ.संतोष मुंडे म्हणजे सर्व स्तरात लोकप्रिय ठरलेले सुसंस्कृत युवा नेतृत्व आहे.दिव्यांगासाठी वाहून घेतलेले डॉ.संतोष मुंडे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वेळी सदैव मदतीला तत्पर असतात. त्यामुळे त्यांचे संघटन, जनसंपर्क अफाट झालेला आहे.

    दिव्यांग,विधवा यांच्या हक्कासाठी मागण्या प्रश्नसोडविनारे डॉ. संतोष मुंडे यांनी काम करत आहेत. त्या माध्यमातून डॉ.नी कर्णबधीर अपंगाना 8000 श्रवणयंत्र मशीन,कुबड्या,काठ्या,यांचे मोफत वाटप केलं आहे. तसेच नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करून रुग्णांचे  मोफत तपासणी व ऑपरेशन, मोतीबिदुचे 400 च्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. करण्यात आले. तालुक्यात २९ लाख रुपये अपंग निधी, दिव्यांगाना घरकुल आ.धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून वितरित केली. त्यांच्या मागे अपंग,विधवा, माजी सैनिक यांची मोठी ताकत उभी झाली आहे.

            आरोग्याच्या बाबतीत फार ताकतीच काम उभं केलं आहे."धनंजय मुंडे आरोग्य मित्र" योजना सुरू केली आहे. त्याच्या माध्यमातून गावातल्या शेवटच्या पेशंट पर्यंत मदत पोहचविण्याचे पुण्याचं काम डॉ.संतोष मुंडेच्या पुढाकाराने होत आहे. वेगेगळया रक्त तपासणी शिबिर, बी पी.शुगर तपासणी व मोफत उपचार ही शिबिर तालुक्यात आयोजित करून सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळवून दिला. तर कॅन्सर व ईतर दुर्धर आजारावर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी, मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी मिळवून देण्यासाठी डॉ. संतोष मुंडे  साहेब स्वत: जातीने प्रयत्न करतात.अनेक रुग्णांना मोफत उपचार आणि आरोग्य सहायता निधी मिळवून दिला आहे.हे कार्य करीत असताना कोणत्याही स्वार्थ  ना महत्त्वकांक्षा डोळ्यासमोर कधीच ठेवली नाही. 

        डॉ. संतोष मुंडे यांचे मुळ गाव नाथरा प्राथमिक शिक्षण नाथरा व परळी येथे तर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मुंबईतील वैद्यकीय काँलेजला पूर्ण झाल्यानंतर डॉ. मुंडे यांनी परळीत आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. डॉ संतोष मुंडे यांचे वडील एकनाथराव मुंडे हेही वैद्यकीय सेवेत कार्य केले. यामुळे विद्यार्थीदशेपासून सामाजिक कार्याची आवड असल्याने विद्यार्थी दशेतच कार्यास सुरुवात केली. वैद्यकीय शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना मदत आंदोलने केली. हे सामाजिक कार्य करत असताना राज्यमंत्री बच्चू कडूंशी संबंध आले. पुढे बच्चू कडू यांच्या सोबत दिव्यांगासाठी सामाजिक कार्य केले. दिव्यांगाना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली. दिव्यांगाना सायकल, व्हीलचेअर, कुबड्या असे साहित्य मोठ्या प्रमाणावर वाटप केले. कर्ण बधिरांना आजपर्यंत मोफत तपासणी करून १३४० श्रवणयंत्र वाटप केले. गोरगरीबांसाठी तालुक्यातील जवळपास १०० गावात आरोग्य शिबीरे घेतले. ३४० मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून किडणी, ह्दयविकार, कँन्सर,ब्रेनट्युमर, प्लॅस्टिक सर्जरी आदि दुर्धर रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिली. मुंबई, पुणे येथे नामांकित दवाखान्यात दुर्धर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दिव्यांगासाठी काम करत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पंचायत समितीतून दिव्यांगाना ३ टक्के निधीतून ३० लाख रुपये वाटप तसेच नगरपालिकेतून १० लाख रुपयांचे वाटप केले. दिव्यांगाना शिवशाही बस मध्ये टिकीटामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. अपंगासाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. शहिद दिनानिमित्त शहरातील युवकांना घेऊन रक्तदान शिबीरे आयोजित केले. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष असताना तालुक्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना टुथपेस्ट वाटप केले. राज्यात पहिल्यांदा दिव्यांगासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

डॉ संतोष मुंडे यांनी भूषवलेली पदे मेडिकल असोसिएशनचे सलग ५ वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर्स आँफ काँमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर चे संचालक, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, लाँयन्स क्लबचे तालुकाध्यक्ष आदि पदे भूषवत आहेत. तर लंडन मध्ये इंडियन हायकमिशन कडून विशेष गौरव तसेच राज्य पातळीवरील पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

           गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी तत्कालीन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य  राशन कार्ड सप्ताहाचे आयोजन करुन हजारो लोकांची केवळ आणि केवळ डॉ.संतोष मुंडे यांच्यामुळे सुटली.शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ.संतोष मुंडे यांना सामाजिक, आरोग्य, दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 

            दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विराट आंदोलन केले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरले.

             अशा या सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे समाजकार्य करणार्‍या उमद्या युवक नेतृत्वाला आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी हीच प्रभू वैद्यनाथाचे चरणी प्रार्थना.....

✍🏻संकलन 

विश्वजीत मुंडे...✍🏻

संचालक, सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र परळी वैजनाथ

मो.9158363277

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या