💥नांदेड वाघाळा महानगर पालिका प्रशासनात तृतीय पंथीयांचा नौकरीची संधी उपलब्ध करुन द्या....!


💥कमल फाऊंडेशनची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी💥

नांदेड :- नांदेड वाघाळा महानगर पालिका प्रशासनात पुणे/पिंपरी चिंचवड महानगरपालिकां प्रमाणे तृतीय पंथीयांना देखील नौकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी कमल फाऊंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे मंगळवार दि.३१ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आली.

कमल फाऊंडेशनच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की  तृतीयपंथी नोकरी बाबत जसे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निर्णय घेऊन तृतीयपंथीयांना उद्यान विभाग,पर्यावरण विभाग आणी सुरक्षारक्षक विभाग या अंतर्गत नौकरी उपलब्ध करुन दिली त्याच प्रमाणे आपण ही नांदेड महानगरपालिका प्रशासनातील विविध विभागांमध्ये तृतीय पंथीयांना नौकऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात.कारण तृतीय पंथी देखील राष्ट्रीय प्रवाहात सहभाग नोंदवून सन्मानाने जिवण जगण्यासाठी धडपडत आहेत त्यामुळे तृतीय पंथीयांच्या वाढत्या संख्ये मुळे त्यांना लोक पुर्वी प्रमाणे त्यांना देणगी देत नसल्ल्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होत असून त्यांच्याकडे शिक्षण असूनही त्यांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे कारण तृतीयपंथी जरी शिक्षित असले तरी त्यांना कोणीही नौकरी देत नाही. म्हणून आपणास विनंती आहे की आपण ही तृतीयपंथी यांचा सर्वे करून तसेच त्यांच्या शैक्षणिक व अन्य कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कोणत्या श्रेणीमध्ये सामावून घेता येईल ते आपण पहावे. व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असेही निवेदनात म्हटले असून या निवेदनावर कमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप गोधने यांच्यासह फरीदा शानुर बकश,बजली शानुर बकश, रुपा ताडकळस,मेहक फरीदा बकश आदींच्या स्वाक्षरी आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या