💥भारतीय संविधानाचा जागर म्हणजे बुद्ध विचारांची पेरणी - इ.झेड.खोब्रागडे


💥पुर्णेत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.२६ जानेवारी रोजी आयोजित २१ व्या संविधान गौरव सोहळ्यात ते बोलत होते💥


पूर्णा (दि.२७ जानेवारी) - भारतीय संविधानाचा जागर म्हणजे बुद्ध विचारांची पेरणीच आहे.समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही बुद्धाची शिकवण आपले संविधान देते भारतीय संविधान कोणत्याही विशिष्ट लोकांचे नसून ते तब्बल १४० कोटी भारतीयांचे असून त्याचे वाचन करणे म्हणजे वाचविणे होय,असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत मा.इ.झेड.खोब्रागडे यांनी केले.


पुर्णा शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि.२६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित २१ व्या संविधान गौरव सोहळ्यात मा.इ.झेड.खोब्रागडे यांनी आपले विचार व्यक्त केले ते या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा जामा मस्जिदचे शाही पेशइमाम मौलाना शमीम अहमद रिजवी हे होते तर विचार मंचावर पूज्य भदंत डॉ. उपगुप्तजी महास्थविर,पूज्य भदंत मुदिता नंद,भदंत पंय्यावांश, माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे,परभणी चे महापौर यांचे प्रतिनिधी रवि सोनकांबळे,रिपब्लिकन नेते बी एच सहजराव,पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मार्कड,ॲड.रवि गायकवाड यांची उपस्थिती होती.


संविधान गौरव सोहळ्याच्या प्रथम सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी १०-०० वाजता पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी  म्हास्थविर यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यानंतर ॲड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड.सूर्यकांत काळे, ॲड सईद,नगरसेवक अमृत मोरे,मधुकर गायकवाड,ॲड.भवरे,ॲड.सिध्दार्थ खरे,डॉ.गंगाधर कांबळे,डॉ.संदीप जोंधळे, गट नेते उत्तम खंदारे, नगरसेवक धम्मदीप जोंधळे,मुकुंद पाटील,दिलीपराव गायकवाड,नागेश येंगडे आदी मान्यवरांसह संविधान गौरव समितीच्या पदाधिकारी यांनी घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यानंतर दुपारी ०१-०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पंचरंगी ध्वजाचे भदंत पंय्यावंश यांचे हस्ते करून संविधान तैलचित्र आणि ग्रंथाची भव्य अशी मिरवणूक वाद्यवृंधासह चंदेरी रथात काढण्यात आली.या मिरवणुकित प्रा.बंडु गायकवाड,आणि ॲड. हिरानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या लेझिम पथकाने मिरवणुकीतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणूक शहराच्या प्रमुख  मार्गाने चालतांना मुख्य बाजारपेठेत असलेल्या छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेस संविधान गौरव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या मिरवणुकीचे संविधान गौरव सोहळ्यात रूपांतर झाले.

संविधान गौरव सोहळ्याचे उद्घाटन पुर्णेचे नगरध्यक्षांचे प्रतिनिधी मा.संतोष एकलारे यांचे हस्ते दीप्रज्वलनाने व संविधान ग्रंथाच्या पूजनाने करण्यात आले या प्रसंगी सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महास्थाविर यांना "धम्मदुत" सन्मान पत्र, स्मुर्तीचीन्ह,शाल पुष्पहार देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.त्याप्रमाणे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मा.इ.झेड.खोब्रागडे यांनाही सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले दोन्ही मान पत्राचे वाचन प्रा.डॉ.गोनारकर यांनी केले.

    यावेळी पूर्णेकरांनी केलेल्या सन्मानाने खोब्रागडे भारावून गेले.त्यांनी आपल्या भाषणात गौरव समिती व पूर्णे करांचे मनस्वी आभार व्यक्त करताना ते म्हणाले,ज्यांची माझी पहिल्यांदाच भेट होते आणि ज्यांना मी काहीही दिलेले नाही त्यांनी माझा एव्हडा मोठा मोठा सत्कार करावा ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे हे संविधामुळेच घडले असे मी मानतो ते पुढे म्हणाले,' सर्वांना जोडणे म्हणजे संविधान संविधान आधिकरी,कर्मचारी आणि नागरिक यांच्यात मूलतः रुजले पाहिजे. संविधानामुळेच आपल्याला भारतीय असल्याची ओळख मिळाली.म्हणून आपण संविधानाबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे. संविधानामुळे ८५%बहुजनांना ५०% आरक्षण मिळाले तर १५%लोकांना५०%आरक्षण आहे.तरीही खुल्या वर्गातील लोक बहुजनांच्या आरक्षणास दूषणे देतात.हे योग्य नाही.आंबेडकर वादाची व्याख्या करताना ते म्हणतात अन्याय अत्याच्याराच्या हजारो,लाखो,करोडो लोकांच्या विरुद्ध आवाज उठविणे म्हणजेच आंबेडकरवादी होणे आहे,जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येक सत्याग्रहात केला.प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला.त्यांचे आपण वैचारिक वारस आहोत याचे आपण भान ठेवले पाहिजे.

     या  गौरव सोहळ्यात स्टार प्रवाह वाहिनीने "मी होणार सुपर स्टार या बाल कला कारांच्या गीत स्पर्धेत प्राविण्य मिळवून परभणी जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात गाजविल्याने संविधान गौरव संविधान गौरव समिती,पूर्णाच्या वतीने कुमारी प्रांजल बोदक हिला रुपये ५०००/- (पाच हजार रुपये,) आणि सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात विशेषत्वाने उपस्थिती दर्शविल्याने बनाई संघटनेचे अध्यक्ष इंजी संजीवन गायकवाड,आणि त्यांची टीम.,

मराठवाडा बाल रुग्नालयाचे लेखापाल पंडित आढाव,रवि गायकवाड,आणि टीम,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कनकुटे,आदि सह धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निरंजना महिला मंडळ,रोहिणी महिला मंडळ,आम्रपाली महिला मंडळ,विशाखा महिला मंडळ,रमाई महिला मंडळ,तक्षशिला महिला मंडळ,क्रांती महिला मंडळ,भिमाई महिला मंडळ,वैशाली महिला मंडळ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ, लुंबिनी महिला मंडळ आणि महाबोधी चॅनल चे व्रत प्रतिनिधी प्रदीप ननवरे,यांना पुष्पगुच्छ आणि संविधान ग्रंथ देवून स्वागताध्यक्ष प्राचार्य केशव जोंधळे यांचे हस्ते गौरविण्यात आले.

 गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.तर नितीन नरवाडे यांनी सूत्र संचलन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा अशोक कांबळे,अशोक व्हि कांबळे, ,शिवाजी वेडे,भारत जोंधळे,विजयकुमार जोंधळे,सिध्दार्थ भालेराव,मोहन लोखंडे,किशन ढगे,बाळासाहेब राऊत,रौफ कुरेशी,सुनील जाधव,चेतानंद वाघमारे,मिलिंद कांबळे,त्र्यंबक कांबळे,दादाराव पंडित,प्राचार्य राम धबाले,भूषण भुजबळ,गौतम काळे,रमेश बरकुंटे,अनिल खर्ग खराटे,पि.जी.रणवीर,प्रभाकर त्रिभुवन,भीमा वाहुले,शेख नसीर,अधिराज मित्र मंडळाचे पदाधिकारी,सदस्य सर्व संविधान गौरव समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले संविधान कार्यक्रमात आपल्या सुमधुर आवाजात विजय सातोरे आणि संच यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या