💥मुंबईत अग्निशमन दलाची अजब भरती जेव्हा सुशिक्षित बेरोजगार युवकांना अपंग करती ?


💥अग्निशमन दल भरतीतील जंपिंग उडीच्या कवायतीत अनेकांचे पाय कंबरा झाल्या फॅक्चर💥


💥जीवघेण्या अघोरी कवायतीच्या कृत्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या पायाच्या झाल्या शस्त्रक्रिया💥


 
मुंबई/परभणी (दि.२८ जानेवारी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुंबई महानगर पालिका अग्निशमन दलाच्या ९१० जागांच्या भरती करीता भरतीची प्रक्रिया दि.१३ जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ पासून लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान, जे बी सी एन शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर बजलेश्वर, दहिसर पश्चिम मुंबई ४००१०३,येथे दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात चाचणी प्रक्रिया चालू झाली आहे.या अग्निशमन दलाच्या भरतीसाठी परभणी, हिंगोली,नांदेड,लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्वच ठिकाणाहून सुशिक्षित बेरोजगार पात्र विद्यार्थी मुंबई येथे गेले असता परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भरतीच्या वेळी शारीरिक कवायती शारीरिक चाचणी प्रक्रिया स्टेप पार पाडताना एका जीवघेण्या अघोरी कवायत चाचणीचा जिवघेणा अनूभव येवून या चाचणीतील १९ ते २० फुट उंचावरुन खाली जमिनीवर जंपिंग उड्या तेथील भरती कमिटीच्या कर्मचा-यांनी  मारायला लावल्या. यावेळी उंचावरुन ज्या ठिकाणी जमीन ग्राऊंडवर उडी पडणार आहे. त्या ठिकाणी कठीण गाद्या ठेवल्या होत्या. आणि त्या गादीवरती काही कर्मचारी नेट जाळी धरुन होते. जेणेकरुन उडी जमीनीवर पडण्याच्या स्थितीत येताच ही जाळी ताणून धरायची असते.काही जणांना ही जाळी ताणून धरल्या गेली तर काही जणांना ती धरली नसल्याने असंख्य भरती उमेदवार उडी मारताच कठीण गादीवर पाय आदळून पडले. 


यात असंख्य जणांच्या कंबरा व दोन्ही पाय कचका खावून मोडून फॅक्चर झाल्या.हा प्रकार भरतीवेळी तारीख २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ नंतर झाला. भरतीसाठी आलेल्या विद्यार्थी उमेदवारांची चेष्टा केल्याप्रमाणे त्यांच्या शारीरिक जिवीताच्या हानीचा खेळखेळल्याने भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व निर्माण केल्या गेले. तर काही उमेदवार जंपिंग उडी मारत असताना ओळखीचे असल्यागत पार्सलिटी करीत जाळी ताणून धरत होते. अशांना कोणतीही शारीरिक ईजा झाली नाही.ज्या उमेदवारांचे पाय फॅक्चर झाले त्यांच्यावर पायातील हाडावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येवून या अग्निशमन दलाच्या भरतीमुळे जिवीताची मोठी हानी झाली आहे.अगोदरच लोकसंख्या वाढीमुळे कोणत्याही शासकीय नौकर भरतीसाठी कमालीची स्पर्धा निर्माण झाल्याने नौक-या मिळणे कठीण झाले असताना त्यातच अशा अघोरी कृत्यामुळे जाणिवपूर्वक भरतीपासून वंचित ठेवून आपल्या मर्जीतील काही जणांना मात्र साथ मिळाली असल्याचे भरतीसाठी गेलेले  विद्यार्थी उमेदवार बोलून दाखवत आहेत.ज्या विद्यार्थी उमेदवार अग्निशमन दलाच्या भरती दरम्यान जंपिंग उडी मारुन पाय फॅक्चर झालेत. अशा उमेदवारांना त्यांच्या जिवीताची जी हानी झाली त्याची शासनाने नुकसान भरपाई देवून त्यांना इतर खात्यात शासकीय सेवेत सामावून घ्यावे. असी मागणी अग्निशमन दलाच्या भरतीवेळी जंपिंग उडीत  पायास दुखापत झालेल्या सबंधित विद्यार्थी उमेदवाराकडून केली जात आहे. 


मी आणि आमच्या गावचे काही दहावी बारावी पास शिकलेले उमेदवार अग्निशमन दलाच्या भरतीसाठी मुंबई येथे गेलो होतो. तेथे तारीख २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी भरती ग्राऊंडवर पोहचल्यावर आमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे व ईतर पात्र बाबी तपासून भरतीकामी सुरुवात केली.भरतीसाठी योग्य असलेल्या काही चाचण्या घेण्यात आल्या. शेवटी १९ ते २० फुट उंचीवरुन जंपिंग उडी मारायला लावली. त्यावेळी उडी मारल्यानंतर खाली जमीनीवर ठेवलेल्या कडक गादीवर मी पाय आदळून पडलो.माझ्या पायास जबर आतून आदळून मुकामार लागला एक पाय तर घोट्याजवळ हाड मोडून फॅक्चर झाला.असे प्रकार तेथे अनेकांना झाल्याचे पहावयास मिळाले.तेथे जंपिंग उडीत मार लागलेल्यांच्या अंबूलंसच भरुन जात होत्या. केवळ तात्पुरते पेन क्लियर औषध देवून.भरती ग्राऊंडवरुन अपात्र झाल्या म्हणून काढून देत होते.त्यामुळे या पाय व कंबर मोडीच्या दुखापती होत असल्यामुळे बरेचजण भरती सोडून निघून गेले.माझा पाय फॅक्चर झाल्याने मुंबई येथून नांदेड ला मला एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले.माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.मी मोठ्या आशेने अग्निशमन दलाच्या भरतीसाठी गेलो होतो.मी अतिशय गरीब कुटुंबातील व अत्यल्प भुधारक शेतक-याचा मुलगा असल्याने मला शासकीय नौकरीची गरज होती.परंतु जंपिंग उडीत माझ्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने मी भरतीपासून वंचित राहील्याने माझे आयुष्य खराब झाले आहे.महाराष्ट्र राज्याचे सुजाण आणि गोरगरिबांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला अन्य कोणत्याही खात्यात शासकीय सेवेत सामावून घेणे आवश्यक आहे.

 जगदीश मुंजाजी ढोणे, रा पांगरा लासीना, ता पूर्णा जि परभणी.

९५२९४९०९३५.

(अग्निशमन दल भरती दरम्यान दुखापतग्रस्त उमेदवार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या