💥हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा येथील निरगुडे कुटुंबाची यशोगाथा दिड एकरात लाखाचे उत्पन्न....!


💥असाच प्रयोग करण्यास निरगुडे इतर शेतकऱ्यांना सांगतात💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीची कास धरून योग्य नियोजनाने लाखोचे उत्पादन घेतल्याचा यशस्वी प्रयोग हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा  येथील शेतकरी रामदास निरगुडे  यांनी आधुनिक शेतीची कास धरून सेंद्रिय शेतीचा प्रयोग करत आज दिड एकर शेतातून त्यांनी वर्षाला तीन लाख रुपयाचे उत्पादन घेतले आहे. 

निरगुडे यांना शेतीची आवड असल्याने नेहमीच केळीची भाग जांब भाग हळद, लसूण, कांदा व भाजीपाला व  इतर नव्या वानांची लागवड करून वर्षाकाठी निरगुडे प्रयोग करून बघतात आणि त्यांना यशही मिळत आहे. असाच प्रयोग करण्यास निरगुडे  इतर शेतकऱ्यांना सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनात काही शेतकऱ्यांनी लाभ मिळविला आहे. यंदाचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिके वाया गेले. पिकांना पावसाचा फटका बसल्याने कपाशी तूर व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. फळबागानांही फटके बसले.

परंतु, यातून निरगुडे  प्रयोग  करणारे शेतकरी मात्र सावरलेत. सेनगाव तालुक्यातील  प्रयोगशील शेतकरी म्हणून रामदास निरगुडे यांची ओळख निर्माण झाली आहे हें त्याच्या शेतात  पीक म्हणून त्यांनी हिवरखेडा  शिवारातील शेतीमध्ये दिड एकर शेतात त्यांनी जवळपास 2000 हजार झाडाची लागवड केली आहे  जांब 600 केळी 150 नारळ 50 लिंबू 150 शेवगा 300  रामफळ 200 सिताफळ 20 चिकू 20आंबा 500 असे एकुन त्यांनी 2000 हजार झाडाची लागवड केली आहे आणि यातून वर्षाला ते 3 लाखाचे उत्पादन घेतात. 

रामदास निरगुडे हें त्याच्या कुटुंबा सोबत शेतात राहतात निरगुडे यांच्या कडे 3 एकर शेती आहे दिड एकर मध्ये त्यांनी विविध प्रकारची फळझाड लागवड केली आहे आणि बाकी उर्वरित शेतात ते सोयाबीन हळद कापूस व भाजीपाला लागवड करतात निरगुडे यांना दोन मुले आहेत सुनील निरगुडे अभिषेक निरगुडे हें दोन मुले व त्याची आई हें शेतात राबराब कष्ट करतात आणि हें शेतातील आलेला माल  स्वता विकतात त्यामुळे त्याना यातून जास्त नफा मिळतो निरगुडे शेतीला जोड धंदा म्हनून शेळी पालन देखिल करतात त्याच्या कडे आत्ता दहा शेळ्या देखिल आहेत यांच्या शेतात सर्व प्रकार ची झाडे आहेत त्यामुळे शेतातून बाहेर देखिल निघावे वाटत नाही 

किमया बघण्यासाठी या शेतात :-

रामदास निरगुडे यांनी आपल्या शेतातील दुऱ्यावर देखिल केळी शेवगा नारळ या सह रामफळ सिताफळ असे अनेक झाडे लावली आहेत जवळपास त्यांनी सुमारे 2000 झाडे लागवड केली आहेत योग्य प्रकारे नियोजन व सर्व सेंद्रिय शेती केली आहे सेंद्रिय शेती मुळे शरीरावर आजार देखिल होत नाहीत आत्ता त्याच्या शेतातील 150 केळी घड आले आहेत तसेंच 20 -झाडे नारळ हें देखिल विक्री साठी आलेले आहेत  आणि शेवगा देखिल आत्ता पुढील महीन्यात विक्री साठी येतों निरगुडे यांचे हें नियोजन पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्याच्या शेतात येतात इतर शेतकऱ्यांनी देखिल निरगुडे यांचा आदर्श घ्यावा जने करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या