💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाचे रासेयोचे विशेष शिबिर संपन्न....!


💥निरोप समारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटेगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले💥


पुर्णा (दि.२० जानेवारी) - श्री गंगाजी बापू व श्री दाजी महाराज मठ  संस्थानच्या सानिध्यात गोदावरी नदीच्या कुशीत मौजे भाटेगाव येथे श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय विशेष शिबीर संपन्न झाले.... निरोप समारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जि. प. प्रा. शाळा भाटेगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शिबिराला प्रमुख उपस्थिती संस्थेचे सहसचिव मा. श्री गोविंदराव कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार ग्रामसेवक श्री संजय बोबडे,सरपंच प्रतिनिधी श्री माधवराव कऱ्हाळे,उपसरपंच श्री रामराव कऱ्हाळे, मुख्याध्यापक श्री श्रीराम कौडगावे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री व्यंकटराव कऱ्हाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री पुंडलिक कऱ्हाळे ,सहशिक्षक श्री डोणगावकर गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर 'युवकांचा ध्यास ग्राम शहरांचा विकास' या विचाराने आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर १२ ते १८जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आले.

निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात स्वछता दूत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय सेवा योजना स्वागत गीताने झाली.

 या सात दिवशीयविशेष शिबिराचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. पुष्पा गंगासागर यांनी सात दिवशीय अहवाल व्यक्त करतांना म्हटले कि शिबिरात विविध विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माध्यमाचे बदलते स्वरूप व युवक, युवा मन व नैतिकता, व्यक्तिमत्व विकास मोबाईलचे समाज जीवनावर होणारे परिणाम, आजचा युवक व सद्यस्थिती, ध्यानधारणा, व्यसनाधीनता व युवक, पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, ग्रामविकासात महिलांचे योगदान,  आरोग्य तपासणी शिबिर, मतदार जनजागृती, बालविवाह प्रतिबंध कायदा , अंधश्रद्धा निर्मूलन,सेंद्रीय शेती काळाची गरज गरज, भारतीय संविधान, ग्राम विकासात युवकांचे योगदान 

प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ग्राम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, आरोग्य शिबीर सर्व रोगनिदान शिबिर, तंटामुक्त गाव मतदान जनजागृती स्त्री भ्रूण हत्या,  व्यक्तिमत्व विकास, स्वच्छ भारत अभियान व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आदी कार्यक्रम जवळून पाहता व अनुभवता आले. सात दिवशीय शिबीरात आलेले अनुभव गायगोंधने, दाक्षयणी, काशिनाथ, आकाश, प्रजाने या स्वयंसेवकांनी व्यक्त केले.ग्रामसेवक श्री संजय बोबडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि युवा शक्ती लात मारील तेथे पाणी काढण्याची हिंमत या युवकांत असते परंतु आजचा युवक मोबाईलमध्ये कसा व्यस्त झाला त्यांच्या कला गुणांचा ऱ्हास कसा होत आहे हे सांगितले.संस्थेचे सहसचिव मा. श्री गोविंदराव कदम यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या सात दिवशीय शिबिरातील श्रमदानाचे कौतुक केले आणि महाविद्यालयामार्फत चांगल्या कार्याला सदैव सहकार्य राहिल असे म्हटले. डोणगावकर यांनी विदयार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले. या सात दिवशीय विशेष शिबीर जि. प. प्रा शाळा भटेगाव परिसरात असल्यामुळे शाळेतील विदयार्थी व शिक्षक यांच्या सोबत आपुलकीचे नाते निर्माण झाले या आपुलकीतून आलेले अनुभव शिक्षिका सुरेखा मादस्वाड यांनी आपल्या कवितेतुन सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के राजकुमार यांनी विदयार्थीनी सात दिवशीय शिबिरात स्वयंसेवकांनी नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी एक व्यासपीठ असून विदयार्थ्यांच्या ग्रामीण भागाविषयीं असणारी आत्मीयता या शिबिरातून जवळून पाहता आली. विदयार्थ्यांनी केलेल्या कार्याचे अभिनंदन करून भविष्यात विदयार्थ्यांनमध्ये असे कार्य करण्यासाठी नेतृत्व सिद्ध करता यावे यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.अजय कुऱ्हे, डॉ. सोमनाथ गुंजकर, डॉ. दिशा मोरे, डॉ स्मिता जमदाडे,श्री बालाजी आसोरे, श्री मंचक वळसे, श्री नागोराव सावळे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ओंकार चिंचोले यांनी केले, तर आभार डॉ. विनोद कदम यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या