💥भांडवलदारांच्या माध्यमाने लोकशाहीत पेशवाई आणण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करीत आहे - प्रकाश कांबळे


💥भीमा कोरेगाव अभिवादन सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते💥

पूर्णा (दि.०१ जानेवारी) : देशातील सर्व मागासवर्गीय घटकांना पद,पैसा,आणि प्रतिष्ठा यांच्यापासून दूर ठेवून देशातील उद्योगांचे खाजगीकरण करून ते भांडवल दारांच्या हातात देवून शासकीय नोकऱ्या संपुष्टात आणून लोकशाहीत नवीन पेशवाई आणण्याचे काम केंद्रातील भाजपाचे सरकार करीत असल्याचा घणाघात रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी भीमा कोरेगाव अभिवादन सभेत व्यक्त केला ते या अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे होते या प्रसंगी भीमा कोरेगाव क्रांती स्तंभाच्या प्रतिकृतिस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी रिपाई नेते प्रकाश कांबळे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले भदंत पय्यावंश यांनी उपस्थितांना त्रिसरन पंचशील दिले डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या अभिवादन सभेचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष त्रिंबक कांबळे यांनी केले.

या सभेत श्रीकांत हिवाळे,अनिल खर्गखराटे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,दादाराव पंडित,गटनेते उत्तम खंदारे यांनी  या दिनाचे महत्त्व विशद करून अभिवादन केले या अभिवादन सभेत विचार व्यक्त करतांना कांबळे म्हणाले,' केंद्रातील सरकार संविधानाला समोर ठेवून संविधानाच्या विरोधी कृत्य करीत आहे.

या सरकारने देशातील सार्वजनिक संस्था खाजगी भांडवलदाराना विकण्याचा धडाका लावला आहे.रेल्वे ट्रेन विकल्या,नद्या विकल्या,टेलिफोन खाते विकले,अनेक राष्ट्रीय कंम्पण्या विकल्या देशातील नोकऱ्या आणि छोटे उद्योग विकून देशात भांवलशाहीपूरक व्यवस्था निर्माण करून मागासवर्गीय घटकांना पद,पैसा आणि प्रतिष्ठा यांच्यापासून  वंचित ठेवून पुन्हा देशात नवीन पेशवाई आणण्याचे मनसुबे रचले जात आहेत,ते वेळीच मोडीत काढन्यासाठी सर्व वंचित घटकांनी एकत्र येवून हा जातीयवादी प्रवृत्तींचा डाव संघटित रितीने व देशातील लोकशाहीच्या हितार्थ उधळून लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे खऱ्या अर्थाने एक महायुद्धच होते त्यांनी या देशातील पिडीतांसाठी काम केले तसे या देशाच्या विकासासाठी मोठे काम केले भारतीय संविधान आणि लोकशाही ही त्यांची देशाला सर्वात मोठी देण आहे तिचे लोकशाहीवर विश्वास,निष्ठा,असणाऱ्या प्रत्येक भारतीयाने भान ठेवून देशातील लोकशाही साठी आपले योगदान दिले पाहिजे.असेही आवाहन त्यांनी केले.

 हि अभिवादन सभा यशस्वी करण्यासाठी मुकुंद पाटील,दिलीप गायकवाड,प्राचार्य केशव जोंधळे,अतुल गवळी,डॉ गंगाधर कांबळे,डॉ.संदीप जोंधळे,कवी उमेश बारा हटे, ॲड राहुल कांबळे,विजय जोंधळे,सूरज जोंधळे,मोहन लोखंडे,पंडित डोंगरे,किशन ढगे,ज्ञोनोबा जोंधळे, आदिसह शहरातील विविध महिला मंडळांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या