💥खराडी येथील विठ्ठल बोराटे नगर येथे एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग....!


💥अग्निशमन दलाकडून येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना💥 

पुणे (दि.१४ जानेवारी) - आज दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ०४•१६ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात खराडी येथील विठ्ठल बोराटे नगर येथे एमएनजीएल गॅस पाईपलाईनला आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच तिथे रस्त्यावर एमएनजीएल या कंपनीची पाईपलाईनने व तिथेच जवळपास असणारी एक हातगाडी पेटल्याचे जवानांनी पाहिले असता तातडीने पाण्याचा सतत मारा सुरू ठेवून आग विझवली. तसेच सदर ठिकाणी एमएनजीएलचे कर्मचारी यांनी धाव घेत तेथील इतर लाईन बंद केली होती. ज्या ठिकाणी आग लागली तेथे खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले असून या घटनेत कोणी ही जखमी नाही. एक दिवसापुर्वीच सिहंगड रस्त्यावर राजाराम पुलावर अशीच मोठी घटना घडली होती. 

या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र येथील चालक रघुनाथ भोईर व जवान उमाकांत डगळे, विलिन रावतु, नवनाथ वायकर,अमित वाघ यांनी सहभाग घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या