💥न्यायालयाच्या निर्णयावर राज्यातील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत💥
✍️ मोहन चौकेकर
राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आणखी एक नवीन तारीख मिळाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख 14 फेब्रुवारी मिळाली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर राज्यातील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘जज साहब तारीख तो मिल रही है, पर इन्साफ नही मिल रहा’, अशी परिस्थिती झाल्याची प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, जज साहब तारीख तो मिल रही है पर इंन्साफ नही मिल रहा, तारीख पर तारीख अशी काहीशी परिस्थिती झाली आहे.
सर्वोच्च न्यायालात हा विषय आहे. आयोग आता नेमकं कशाला हात घालतं पाहावं लागेल. कोर्टात काही निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही ठरणार नाही अंबादास दानवे पुढे म्हणाले की, एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं. हा शिवसेनेचा विजय आहे हे मानावं लागेल....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या