💥हिंगोली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले...!


 💥पिक विम्याच्या मागणी साठी शेतकरी झाले आक्रमक💥 

हिंगोली (दि.२१ जानेवारी) - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पिक विमा उपोषणाला आज चौथा दिवस असून काही उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याने जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काल अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवत आज सकाळी नऊच्या सुमारास गोरेगाव जिंतूर महामार्गावर शेतकऱ्यांनी टायरची  पेटवून दिले आहेत जोपर्यंत आम्हाला पिक विमा मिळत नाही तोपर्यंत हें आमरण उपोषण चालुच राहणार जीव गेला तरी चालेल पण आंदोलन मागें घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येता आहे आज जणांना प्रकृती खालावली आहे. 

दरम्यान या आंदोलनाची दखल मात्र ठोस पणे घेतल्या जात नाही काल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना काळे झेंडे दाखवले मात्र त्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी देखिल या आंदोलनकडे दुर्लक्ष केले आहे मात्र ठाकरे गटाचे जिल्हा प्रमूख संदेश देशमुख व राजेश पाटील गोरेगावकर  यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या मध्ये आंदोलन कर्त्याच्या काही बरे वाईट झाले तर यांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल अशा ईशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे आज जिल्हा कृषी अधिकारी यांनी देखिल आंदोलन स्थळी जाऊन आंदोलन कर्त्याची भेट घेतली मात्र या मध्ये काही तोडगा निघाला नाही 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आंदोलन शनिवारी ता. 21 चौथ्या दिवशी कायम आहे. संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगाव जिंतूर मार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध केला.हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा तसेच मागील वर्षीची 13 कोटी 89 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावंत, शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

मागील चार दिवसापासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शुक्रवारी काळे झेंडे दाखवले तर भगवती येथे काही शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले शेतकऱ्यांच्या या आंदोलना नंतर ही प्रशासन जागे झाले नाही. यामुळे आज शेतकऱ्यांनी गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प केली. तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सेनगाव तालुका कृषी अधिकारी या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी शेतकऱ्यांची भेट घेतली. पिक विम्याच्या प्रश्नावर शासनाला कळविले आहे. विमा कंपनीकडून लवकरच योग्य निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करू असे मोघम उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकरी संतप्त झाले. मागच्या वर्षीची ही रक्कम मिळाली नाही यावर्षीही तुटपुंजी विम्याची रक्कम मिळत आहे असे सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन फेटाळून लावली. त्यामुळे आता हे आंदोलन चांगलेच पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी ही सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.तर पीक विम्याचे प्रश्नावर रविवारी सेनगाव गोरेगाव व हिंगोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या