💥पत्रकारिता जिवन गौरव पुरस्कार वसंतजी पाराशर यांना जाहीर...!💥तर स्व.गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार बुलढाणा लाईव्हचे कृष्णा सपकाळ यांना जाहीर💥 

✍️ मोहन चौकेकर 

चिखली  :- पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी लढणारी संघटना म्हणुन परिचित चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिना निमित्त दरवर्षी पत्रकारीता क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे तथा जनसामान्यांना आपल्या लेखणीतून न्याय मिळुन देणाऱ्या संपादक तथा पत्रकार यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्या जातो.यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी मेहकर येथील जेष्ठ पत्रकार, संपादक  वसंत पाराशर यांची निवड करण्यात आली.

 ०६ जानेवारी २०२३ रोजी  पत्रकार दिनानिमित्त त्यांना  जीवन गौरव २०२२ पुरस्कार चिखली येथील देव्हडे बंधू यांच्या हॉटेल HDR येथे सकाळी ११ वाजता आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच युवा पत्रकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्व. गिरीशजी दुबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ नव पत्रकारिता २०२२  पुरस्कार बुलढाणा लाईव्हचे कृष्णा सपकाळ यांना जाहीर करण्यात आला आहे.  कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश शर्मा तसेच लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटिल   यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अनिल म्हस्के आणि मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचा जाहीर सत्कार यावेळी होणार आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी या  समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहेमद, कोषाध्यक्ष छोटू कांबळे यांनी केले. 

* वसंत पाराशर ठरले यंदाचे मानकरी :-

मेहकर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक वसंतजी पाराशर हे जीवन गौरव पुरस्कार 2023 चे मानकरी ठरले असून त्यांनी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात स्वतःला वाहून घेत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचे उत्कृष्ट काम त्यांनी केले. त्यांची रोखठोक , निर्भीड लेखणी आजही दाद देते. 

* प्रोत्साहनपर नवपत्रकारिता पुरस्कार देणार :-

चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार देण्याचा मानस असतो. त्याचप्रमाणे यावर्षीपासून नवीन धडपड्या पत्रकाराला प्रोत्साहन पर स्व. गिरीशजी दुबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ नव पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरले असून हे नाव कार्यक्रमाच्या ठिकाणी जाहीर घोषित केले जाईल हे विशेष.....

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या