💥जिंतूर शहरात तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप...!


💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमिताने केली स्वच्छता मोहीम 💥

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने आज गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिंतूर शहरातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.


जिंतूर तहसील कार्यालय परिसरात दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहणानिमित्त एकत्र जमत असलेल्या सर्व शाळेतील सर्व बालगोपाळ विद्यार्थ्यांना  महाराष्ट्र पत्रकार संघ सलग्न जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने जिंतूर येथील न्यायालयासमोर परीविक्षाधीन  तहसीलदार अमोल घाटगे तर अँड बाळासाहेब घनसावंत,अँड.ऊन्हाळे आदी वकील,शिक्षक यांच्या उपस्थितीत खाऊचे वाटप करण्यात आले शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी प्रमुख मार्गावरून प्रभात फेरीद्वारे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमतात त्या दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले याबद्दल जिंतूर  तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी समाधान व्यक्त केले 

नंतर सर्व विद्यार्थी घरी परतले परंतु तहसील कार्यालयाचा परिसर खाऊ वाटप केलेल्या कागद आणि कचऱ्यामुळे अत्यंत विद्रुप झाले होते. यावेळी सर्व परिसरात स्वच्छता व्हावी म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांनी स्वच्छता मोहीम करून सुरवात करताच  तहसीलदार स्वतः आणि  नायब तहसीलदार व शासकीय कर्मचारी सहभागी होऊन तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला .

या उपक्रमामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले तसेच खाऊचे वाटप केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद संचारला होता. शहरात अनेक शाळांनी प्रभात फेरी द्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक केले यामध्ये सर्व शाळातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात जिल्हाध्यक्ष प्रदिप कोकडवार, ता. अध्यक्ष अजमत पठाण, कार्याध्यक्ष बी. डी. रामपूरकर ,उपाध्यक्ष रहीम भाई, सचिव फेरोजभाई, संघटक बाबा राज, प्रदिप फाले, खिल्लारे, वाकळे आदी पत्रकार सहभागी होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या