💥जिंतूर बाजारपेठेत ऐन सणासुदीच्या संक्रांत काळातही तिळगुळाचे भाव स्थिर...!


💥यावर्षीची संक्रांत मोठा गोडवा देऊन जाणारी असल्याची दिसते💥 


जिंतर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१० जानेवारी) : - जिंतूर बाजारपेठेत आज मंगळवार दि.१० जानेवारी रोजी फेरफटका मारला असता ऐन मकर संक्रांतीच्या तोंडावर बाजारात संक्रांत पूर्व खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्याचबरोबर बाजारात संक्रांतीला लागणारा महत्त्वाचा तिळगुळ हा स्थिर भावात विकत असताना दिसून आला.

सध्या जिंतूर शहरातील बाजारात तीळ 160 ते 170 रुपये किलो तर गुळ 30 ते 35 रुपये किलो विकत असल्याने यावर्षीची संक्रांत मोठा गोडवा देऊन जाणारी असल्याची दिसते तर महिलांना संक्रांतीनिमित्त लागणारे आवश्यक साहित्य साखरतीळ, हळदीकुंकू ,वाणाचे सामान, वाळूक जांबोर टहाळ आदी सामानांची विक्री बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या