💥नवीन नांदेड येथील सिडको मध्ये श्री गुरु गोबिंदसिंघजी जयंती साजरी.....!


💥कार्यक्रमास गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

नवीन नांदेड (दि.23 जानेवारी) : येथील साधसंगत आणि सेवाभावी भाविकांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. 22 जानेवारी रोजी हॉटेल रूबी सभागृहात शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचा प्रकाशपर्व (जयंती) कार्यक्रम श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमास गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले, कथाकार ज्ञानी सरबजीतसिंघजी निर्मले, बाबा सुबेगसिंघ, दक्षिण मध्य रेलवे नांदेडचे प्रबंधक स. उपेंद्रसिंघ, रविंद्रसिंघ बुंगाई, महेंद्रसिंघ पैदल, गुरु का खालसा संस्थाचे अध्यक्ष स. कश्मीरसिंघ भट्टी, भूपेंद्रसिंघ कापसे, हरभजनसिंघ भट्टी, संजीत सिंघ टर्नल, भरत जायसवाल, राजेंद्रसिंघ टमाना, फतेहसिंघ भाटिया, हरचरणसिंघ भट्टी, सुखदेवसिंघ यांच्या सह भाविकांची उपस्थिती होती. 

श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या प्रकाशपर्वास समर्पित सुखमनी साहेबचे पाठ, कीर्तन, कथा कार्यक्रम पार पाडण्यात आले. ज्ञानी सरबजीतसिंघ निर्मले यांनी यावेळी गुरुजींच्या जीवनकार्यावर आधारित कथा केली आणि अनेक ऐतहासिक प्रसंगाचे कथन मांडले कथा समाप्ती नंतर पारंपरिक पद्धतीने अरदास करण्यात आली. त्यानंतर भव्य प्रमाणात लंगर प्रसाद कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमास सिडको, हुडको, वसरणी, धन्नेगाव, एमआयडीसी आणि नांदेड येथील भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.... 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या