💥वाशिम रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीच्या रंगीत तालीमचे आयोजन...!


💥वाशिमचे पोलिस अधिक्षक बच्चनसिंह यांचे प्रमुख मार्गदर्शन💥


फुलचंद भगत - वाशिम

वाशिम:-राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगअवधान राखुन करावयाच्या कार्यपदधती संबधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन वाशिम शहर हदीतील रेल्वे स्टेशन वाशिम येथे आज दिनांक 11/01/2023 रोजी रेल्वे स्टेशन स्थित प्लॅटफार्म क्र. 01 जवळ कॅटीगच्या मागील बाजूस असलेल्या वेंटींग हॉल येथे तिन दहशतवादयाने अचानकरीत्या हल्ला करून काही लोकांना वेठीस धरल व त्याना पाहून काहा लोक तेथुन पळुन गेले.


सदर माहीती मिळताच वाशिम जिल्यातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचुन कोणतीही जिवीत/वित्तहानी न होवु देता तिनही दहशतवादयाना ताब्यात घेवून जखमींना तात्काळ अॅम्बुलन्स व्दारे दवाखान्यात पाठविण्यात आले.व वेठीस धरलेल्या लोकांना पुर्वव्रत मोकळे करण्यात आले. तसेच बिडीडीस, श्वान पथकाव्दारे रेल्वे स्टेशन स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात आले. फॉरेन्सीक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे

भौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेतलेले दहशतवादी यांना स्थानिक पोलीस ताब्यात देण्यात आले तसेच ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्तावरील गर्दी सुरळीत करण्यात आली तसेच स्टेशनवरील झालेला गोंधळ मेगा फोन व्दारे सुचना देवुन नियंत्रणात आणण्यात आला.

सदर रंगीत तालीम (मॉक ड्रील) पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिलकुमार पुजारी यांचे उपस्थितीत पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री जाधव साहेब व स्टाफ, पोलीस निरीक्षक पी.एन. गायकवाड दविप अकोला व स्टाफ, पोलीस निरीक्षक श्री जगदाळे शवाशा व स्टाफ,सिआयओ श्रीमती आश्वीनी जाधव राज्य गुप्तवार्ता विभाग वाशिम व स्टाफ, सपोनि श्रो. राजेश गाठे पोस्टे वाशिम शहर व स्टाफ, सपोनि श्रीमती गाढवे रेल्वे पोलीस व स्टाफ, पोउपनि श्री. सुळे बिडीडीएस व स्टाफ पोउपनि श्री.

अनिल पाटील व स्टाफ दविशा. पोउपनि श्री राहुल चौधरी व स्टाफ, पोउपनि श्रीमती रोंढे अंगुलीमुद्रा व स्टाफ,एएसआय अजय शुक्ला रेल्वे सुरक्षा बल व स्टाफ, वैदयकीय अधिकारी अॅम्बुलन्ससह व स्टाफ, अग्निशामकदल व स्टाफ व पोलीस कवायत निदेशक श्री करपे, श्री मोसिक, श्री आमीर व जलद कृती दल (क्युआरटी) असे हजर होते.सदर रंगीत तालीम ही आज दिनांक 11/01/2023 चे 11.59 ते 13.10 वाजेपावेतो घेण्यात आली

दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंग अवधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे या बाबत सदर रंगीत तालीम व्दारे दर्शविण्यात आले. तसेच नागरीकांना जागुरुक राहुन दहशतवादा संबधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम फोन क्र.07252234834, डायल 112 वर संर्पक करुन कळवावे असे आवाहान वाशिम जिल्हा पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या