💥परळी वैजनाथ तालुक्यातील देवदहिफळ येथे श्री.खंडोबा मंदिरात खाडे कुटुंबियाकडून आकर्षक व मनमोहक पुष्पसजावट...!


💥भाविकांची केली दर्शनासाठी तोबा गर्दी💥


परळी वैजनाथ / धारूर (प्रतिनिधी) :- येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, खोबरे आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवदहिफळ येथे ग्रामदैवत खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी आज रविवार दि.1 जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती. श्री खंडोबा मंदिरात प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव- नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ व खाडे कुटुंबीयांच्या वतीने आकर्षक व मनमोहक अशी फुलाची मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.


          चंपाषष्ठी पासून देवदहीफळ येथे खंडेरायाची यात्रोत्सव दीड महिना भरते. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात देवदहिफळ येथे भाविक उपस्थित राहतात. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. नवीन वर्ष व यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. 

        श्री.खंडोबा मंदिर,देव दहिफळ येथे प्रदीप खाडे अध्यक्ष-कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्था लातूर, सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ व खाडे कुटुंबीयांच्या वतीने नवीन वर्षानिमित्त व यात्राउत्सव निमित्त महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदहिफळ येथील ग्रामदैवत श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबाच्या संपूर्ण श्री.खंडोबा मंदिर व गाभाऱ्यात मंदिर विविध रंगबेरंगी फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. 


खाडे कुटुंबियाच्या वतीने आज सकाळी श्री खंडोबा मंदिरात श्री खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेऊन व विधिवत पूजन केले. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे विविध प्रकारातील फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली असल्याचे प्रदीप खाडे यांनी सांगितले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या