💥परभणी महानगर पालिका हद्दीतील गुंठेवारी भूखंडांची ‘कर आकारणी’ मागील आठ महिन्यापासून ठप्प...!


💥मनपा प्रशासनाकडून मालमत्ताधारकांची पदोपदी अडवणूक : मायनॉरीटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा आक्षेप💥

परभणी (दि.30 जानेवारी) : परभणी महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी भूखंडांची नवीन घरपट्टी कर आकारणी मागील आठ महिन्यांपासून बंद असल्यामुळे मालमत्ता धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संघटनेचे अध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी केला आहे.

         विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठविलेल्या निवेदनातून या संघटनेने गेल्या आठ महिन्यांपासून मनपास मिळणारे उत्पन्न बंद झाले. त्या पाठोपाठ नागरीकांना वेठीस धरण्याचे प्रकारही सुरु झाले आहेत, अशी खंत व्यक्त केली. गुंठेवारी भूखंडावरील मालमत्ताधारक हे गोर-गरीब आहेत. या मालमत्ता धारकांना करारनामे, खरेदीखत, फेरफार हस्तांतरण करण्याकरीता मोठा बोजा सहन करावा लागणार आहे, तो बोजा झेपवणारा नाही. नियमितपणे सुरु असलेली नवीन घरपट्टी, मालमत्ता कर आकारणीही बंद आहे ती का बंद केली याचाही मनपाद्वारे खूलासा होत नाही, असे स्पष्ट करीत मालमत्ता विभागातील अनागोदी कारभारावरसुध्दा या संघटनेने आक्षेप नोंदविले आहेत. तीन विभागाची जबाबदारी एकाच कर अधिक्षकावर आहे. त्यामुळे कामे होत नाहीत. अर्ज प्रलंबित आहेत. वास्तविकतः तीनही प्रभागार स्वतंत्र कर अधिक्षक, दोन कर निरीक्षक अपेक्षित असतांना मनपाद्वारे त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. नवीन मालमत्ता आकारणी, नावाची दुरुस्ती, फेरफार, हस्तांतरण करण्याकरीता ऑनलाईन संगणक यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असे मत नोंदवून आठ महिन्यांपासून कार्यालयांमध्ये हजारो अर्ज प्रलंबित असल्याने व घरपट्टी लागू नसल्याने विविध योजनांचा लाभ घेण्यापासून गोरगरीब कोसोदूर राहत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या