💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!💥नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी : अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड💥

 ✍️ मोहन चौकेकर 

* जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पण जुनी पेन्शन योजना लागू झाली तर तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार, 'क' वर्ग कर्मचाऱ्यालाही मिळणार 30 हजारांची पेन्शन 

* शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्या अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, सोहळा राजकीय असल्याची संजय राऊतांची टीका, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना संबोधित करणार 

* शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावर कार्यक्रमाची आसनव्यवस्था 'प्रोटोकॉल'प्रमाणे… पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  असलेल्या मंचावर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येतील का?

* उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता; तर माझी युती फक्त शिवसेनेसोबत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नंतर पाहू, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य 

* पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा,  लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी,  'धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले'; धनंजय देसाईंची अजित पवारांवर जहरी टीका 

* धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार, गोळीबारामुळे परिसरात खळबळ 

* महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं; थंडीचा कडाका वाढला, स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता 

* ऐन थंडीत पाऊस; हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज

* नाशिककरांसाठी मोठी बातमी ! शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, तीनशे कोटी रुपयांचा खर्च, दहा हजार वृक्षांवरही कुऱ्हाड 

* नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड, अमेरिकन सरकारकडून मिळाली शिष्यवृत्ती  

* आलिया भट्ट दुसऱ्यांदा प्रेग्नंट ? 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

* ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड,  चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला 

* क्रीडा मंत्रालय ऍक्शन मोडमध्ये; कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित,  बृजभूषण सिंहांवर कारवाई कधी? 

* ॲव्हेंजर्स’ फेम अभिनेत्याची अपघातात  ३० हाडं  मोडली

* नामांतरच करायचं असेल, तर महाराष्ट्राचं नाव…; अबू आझमी यांचं मोठं विधान

* एकनाथभाऊ शिंदे हा राजकारणातला नारायण…; अजब पात्राशी तुलना करत सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी!

* पुणे : ‘धर्मवीर’ हीच छत्रपती संभाजी महाराजांची ओळख, शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं अजित पवारांना लक्ष्य

* सरकार कोसळण्याच्या नाना पटोलेंच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, आणखी २० आमदार आमच्या संपर्कात

* पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच, अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

* सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात कोयता गँगने अल्पवयीन मुलावर वार केल्याची घटना घडली.

* महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्यायच केला -- महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

* कुलगुरू, संशोधकही जेवणासाठी ताटकळले; ‘इंडियन फार्मास्युटीकल कांग्रेस’मध्ये नियोजनाचा अभाव

* अमेरिकेने कच्चा माल देण्यास नकार दिला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०६ देशांना करोनाची लस पुरवली ---- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* दिग्दर्शक एस एस राजामौलीशी होणाऱ्या तुलनेवर, महेश कोठारे म्हणाले, “हा माझा सन्मान आहे पण…”

* दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे

* पुण्यातील जनआक्रोश मोर्चात हिंदूंच्या एकजुटीचे दर्शन, विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग

* सुनील केदारांची भाजपच्या दुटप्पी धोरणावर टीका, म्हणाले, ” ‘आरएसएस’ कार्यकर्त्यांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?”

* शिवसेना प्रमुख‘बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना’ अधांतरीच!

* बाळासाहेब ठाकरेंच्या नावे राजकारण जोरात तर सात वर्षांनंतरही विमा योजना अंधारात

* शिवसेना व वंचित आघाडीच्या युतीला राष्ट्रवादीचा हिरवा कंदील? जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान

* उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे

* IND vs NZ: मोहम्मद शमीने अनिल कुंबळेशी बरोबरी करताना रचला नवा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला १०वा भारतीय

* वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा; सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला. उस्मानाबाद येथील हॅलो मेडिकल फाउंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला

* राष्ट्रपतींच्या द्रोपदी मुल्य यांच्या हस्ते हस्ते उद्या बाल पुरस्कार प्रदान ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते उद्या दिल्लीतील विज्ञान भवन येथे 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

* नाशिक शहरात 300 कोटी रुपयांचा होणार रिंग रोड ;कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तब्बल 300 कोटी रुपयांचा रिंग रोड तयार होणार, यामुळे नाशिककरांची वाहतूक कोंडी पासून सुटका होणार

* उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ; शिवसेनेचा गड असलेल्या परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला.

* रिलायन्स जिओला 4,638 कोटींचा नफा ;रिलायन्स जिओ कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान, मागील आर्थिक वर्षाच्या सरासरीत 4,638 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे.

* अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच होणार आई; अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

* विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, NCP नेते ॲड मोरेश्वर टेमुर्डे यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

* चीनमध्ये कोरोनाचा कहर; गेल्या सात दिवसांत 13 हजार जणांचा मृत्यू

* Somaliaमध्ये अमेरिकेचा एअर स्ट्राईक; Al-Shabab दहशतवादी संघटनेचे 30 जण ठार

* भुकंपाच्या झटक्याने उत्तराखंड हादरलं, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल

* हिवाळ्यात पावसाळा! राज्यात पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा महत्वपूर्ण अंदाज

* भारतीय बनावटीची पहिली नाकावाटे दिली जाणारी लस iNCOVACC 26 जानेवारीला होणार लॉन्च

* 35 गरजू मुलांची मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया:जळगावात डाॅक्टरांकडून 125 मुलांची तपासणी, रोटरी क्लबचा पुढाकार

* गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या