💥चिखली जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तीन जखमी....!


💥या दुर्दैवी दुर्घटनेमुळे चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे💥

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : चिखली पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या साकेगाव रस्त्यावर काल रविवार दि.२९ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२-३० वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर कारची जोरदार अशी धडक लागून   दुर्दैवी असा भंयकर अपघात घडला. या अपघातात माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे छोटे बंधु सुनील देव्हडे व हर्षल पांडे या दोन्ही तरुण युवकाचा  घटनास्थळीस दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण गंभीर असून दोघांना थोडी दुखापत झाली आहे.


या अपघाताचे बाबत सविस्तर वृत्त असे चिखली येथील रेणुका देवी मंदिर परिसरात राहणारे सुनील किसनराव देव्हडे ( ४० ), हर्षल बजरंग पांडे ( ३५ ), आकाश रमेश चिंचोले ( २६) आणि यश वाधवानी ( २६ ) हे चौघे युवक साकेगाव येथे राहणाऱ्या पप्पू परिहार यास घरी सोडण्यासाठी रात्री १२ :३० वाजेदरम्यान सुनील देव्हडे यांच्या  एम एच २८ व्हि ६९११  या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने साकेगाव येथे चालले होते. या दरम्यान अकस्मात रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडाला कारची जोरदार धडक लागली. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातात सुनील देव्हडे आणि हर्बल पांडे हे दोघे घटनास्थळीच ठार झाले.


दरम्यान या अपघाताची माहिती मयत सुनील देव्हडे यांचे बंधू माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांना रात्री १ वाजेनंतर मिळाली. ते ताबडतोब आपल्या मित्र व नातलगांसह पोहचले व त्यांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पप्पू परिहार यासह दुखापत झालेल्या आकाश चिंचोले आणि यश वाधवानी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अपघाताचे वृत्त समजताच चिखली शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. माजी नगराध्यक्ष सुरेशअप्पा खबुतरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कपील खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ठाकुर, धनंजय व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, माजी नगरसेवक दत्ता सुसर, आदींसह अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. या भंयकर अश्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या