💥पुर्णेत अखील भारतीय मराठी पत्रकार संघाकडून जेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत दर्पण दिन उत्साहात साजरा...!


💥दै.लोकमत वृत्तपत्रात दिड दशकाचा काळ गाजवलेले जेष्ठ पत्रकार विजयची बगाटे यांचा पत्रकारांनी केला सत्कार💥

💥पत्रकार हा समाजाचा आरसा आहे - हिराजी भोसले,जेष्ठ पत्रकार पूर्णा


पूर्णा (दि.०७ जानेवारी):- येथील नगर परिषदेतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात काल शुक्रवार दि.०७ जानेवारी २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाकडून आयोजित 'दर्पण दिन' कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना जेष्ठ पत्रकार सन्माननीय हिराजी भोसले सर म्हणाले की पत्रकार हा समाजाचा खऱ्या अर्थाने आरसा असतो यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ हरिभाऊ पाटील तर सत्कार मूर्ती म्हणून जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय बगाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दर्पण दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रथमतः मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व 'मुकनायक' वर्तमान पत्राची सुरुवात करुन निर्भिड जनहीतवादी पत्रकारीतेची खऱ्या अर्थाने सुरुवात करुन कोट्ट्यावधी दिन दुबळ्या सोशीत वंचित समाजाला न्याय मिळवून देणारे महामानव परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारितेच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय  कार्याबद्दल व सेवानिवृत्ती बद्दल दै.लोकमत वृत्तपत्रात दिड दशकाचा काळ गाजवलेले जेष्ठ पत्रकार सेवानिवृत्त शिक्षक विजयची बगाटे सर यांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुर्णा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कारमुर्ती विजयजी बघाटे यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना प्रभावशाली बातम्या कश्या कराव्यात, लिखाण कस असावं यावर मार्गदर्शन केलं.

सदर कार्यक्रमास पुर्णा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले,जेष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत शिंदे,दिनेश चौधरी,अतुल शहाणे,अच्युत जोगदंड,नागेश नागठाणे, गजानन हिवरे,मुजीब कुरेशी, म.अलिम,शेख अनिस बाभूमिया,केदार पाथरकर,मास्टर अनिल अहिरे,लक्ष्मण गायकवाड (बोरगावकर), शिवाजी बोबडे,सुशीलकुमार दळवी, अमृत कऱ्हाळे,नवनाथ पारवे,कैलास बलखंडे,सतिश टाकळकर,आदी पत्रकार बंधवांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत जोगदंड  व आभार दौलत भोसले केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या