💥परभणी जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटीमध्ये अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यामार्फत प्राप्त शिफारशी विचारात घेऊन राज्य शासनाकडून नामनिर्देशनाने होणार नियुक्ती💥

परभणी (दि.27 जानेवारी) : राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटी समितीमध्ये अशासकिय सदस्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे खलील अटी पूर्ण करणाऱ्या अशासकीय सदस्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 

 जिल्ह्यातील गोशाळा, पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या पाच ते दहा कार्यकर्त्यांची अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या शिफारशी विचारात घेऊन राज्य शासनाकडून नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यात येणार आहे. 

            या अशासकिय सदस्यांची नियुक्ती तीन वर्षासाठी राहील. परंतु कोणत्याही अशासकिय सदस्याला काढून टाकण्याचे अधिकार शासनास राहतील. तेव्हा परभणी जिल्ह्यातील संबंधित ईच्छुक व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती बायोडाटा) दोन प्रतीत प्राणी कल्याणविषयक केलेल्या कामाच्या तपशील व छायाचित्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात 20 फेब्रुवारीपूर्वी मिळेल, अशारितीने पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी केले आहे. अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने यापूर्वी ईच्छुक व्यक्तींनी वरील बाबींसाठी आपले प्रस्ताव या कार्यालयास सादर केले असतील त्यांनी नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या