💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अजमत खान यांची निवड...!


💥तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब रामपूरकर यांची निवड💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्षपदी अजमत खान तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब रामपूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या साठी शासकीय विश्रामगृह जिंतूर येथे महाराष्ट्र पत्रकार संघ सलग्नित इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोपानराव कोकडवार पत्रकार दिनांचे औचित्य साधून यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन खालील बिनविरोध इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष अजमत खान पठाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब रामपूरकर, सचिव फिरोज खान पठाण, सहसचिव गणेश पालवे, उपाध्यक्ष रहीम शेख हुसेन,  शेख हानीफ बोरी, व बळीराज भराडे वझर, कोषाध्यक्ष रामकिशन ठोंबरे, संघटक खयूम खान उर्फ बाबा भाई ,तर सदस्य म्हणून एकनाथ वाळके यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारणीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी आभार अजित न्यूज चे तालुका प्रतिनिधी भिडे रामपूरकर यांनी केले तर सचिव फिरोज भाई यांनी आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या