💥नांदेड येथे "सिख यूथ फेस्टिवल" स्पर्धांचे जल्लोषात उदघाटन.....!


💥गुरुद्वाराचे सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धांचे उदघाटन💥


नांदेड (दि.१० जानेवारी) : सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था सिख एजुकेशन वेलफेयर असोसिएशन तर्फे चार साहेबजादे यांच्या स्मरणार्थ आयोजित "सिख यूथ फेस्टिवल" स्पर्धांचे उदघाटन आज मंगळवार दि.१० जानेवारी २०२३ रोजी दुपारी गुरुद्वाराचे सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे माजी अधीक्षक स. रणजीतसिंघ चिरागिया, खालसा हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक स.चाँदसिंघ पेशकार,पत्रकार रविंद्रसिंघ मोदी,दैनिक विष्णुपुरीचे संपादक श्री एम.एन.झंपालवाड यांची उपस्थिती होती. 


कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य स. जरनैलसिंघ गाडीवाले यांनी केले सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांनी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून खेळाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. तसेच हॉकी व वॉलीबाल खेळून स्पर्धेचे उद्धघाटन झाल्याचे घोषित केले. चार साहेबजादे यांच्या स्मरणार्थ आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिख यूथ फेस्टिवल स्पर्धेचे आयोजन केल्या बद्द्ल त्यांनी आयोजकांचे अभिनन्दन केले खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

स. जरनैलसिंघ गाडीवाले यानी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे आयोजित दोन दिवसीय ता. 10 आणि 11 जानेवारीला सिख यूथ फेस्टिवल मध्ये हॉकी, वॉलीबाल, बैडमिंटन, दस्तार बंधाई व गुरुबाणी कंठस्थ स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेचे हे 9 वें वर्ष असून सातत्याने स्पर्धा घेऊन समाजाला जोडण्याचे प्रयत्न होत आहेत. वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ भीमसिंघ मुनीम, स. खेमसिंघ पुलिस, स. तरविन्दरसिंघ बडगुजरा, पवनजीतसिंघ गाडीवाले, श्रीमती प्रेमजीतकौर कोल्हापुरे, उत्तमकौर कापसे, गुरदेवकौर पाठिया,  तुलजेश यादव, हरप्रीतसिंघ कपूर, हरजिंदरसिंघ संधू आदिनी परिश्रम घेतले. दोन दिवसीय स्पर्धेत मोठ्या संख्येत खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या