💥जिंतूरात जिंका मानाची पैठणी कार्यक्रम रंगला महीलांचा मोठा सहभाग.....!


💥विजेत्या तीन महिलांना पैठणी देऊन यांचा सत्कार करण्यात आला💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

 जिंतूर आज २७ जानेवारीरोजी  बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेच्या वतीने बुधवार ता.२६ रोजी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या' जिंका मानाची पैठणी' हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला विजेत्या तीन महिलांना पैठणी देऊन यांचा सत्कार करण्यात आला.

       शहरातील बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेत मकर     संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम निमित्त प्रवीण वायकोस बोरीकर यांनी सादर केलेल्या जिंका मानाची पैठणी हा कार्यक्रम घेण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका प्रियंकाताई तोष्णीवाल उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चंदा मुकुंद कोकडवार,अनिता अरुण शहाणे, शिवकन्याताई मुंदडा, गीता काळे, नीता मोरे ,जया चोपडे ,खुशी कुटे, मंगला थिटे उपस्थित होत्या. यावेळी तीन तास चाललेल्या मनोरंजक कार्यक्रमात उत्कृष्ट मॅचिंग, उत्कृष्ट नेकलेस, उत्कृष्ट साडी ,उत्कृष्ट हेअर स्टाईल यासारख्या स्पर्धांना महिलांना विशेष बक्षीस देण्यात आली. तर कार्यक्रमादरम्यान विचारला गेलेल्या प्रश्नांसाठी महिलांना ५० आकर्षक बक्षीस  वाटप करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान महिलांनी झिंगाट गाण्यावर धरलेला नृत्याचा ठेकाही ठेका  उत्साहात अधिकच भर घालून गेला.  कार्यक्रमानंतर विजेत्यांना मानाची पैठणी तर उपविजेत्यांना प्रत्येकी एक मानाची पैठणी देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांना बक्षीस वाटप करण्यात आली. त्यामुळे महिलांचा प्रत्येक स्पर्धेत उस्फुर्त सहभाग दिसून येत होता. या स्पर्धेमध्ये  विजेत्या ठरलेल्या  पूजा गौतम घनसावत यांना मानाची पैठणी तर वंदना बद्रीनारायण पोरवाल व मंदा लक्ष्मण नपते यांना द्वितीय व तृतीय क्रमांकाची मानाची बैठक पैठणी देऊन गौरवण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष ब्रिज गोपाल तोष्णीवाल, सचिव रमण तोष्णीवाल व मुख्याध्यापक गजानन तिखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  पद्मा जाधव तर आभार प्रदर्शन अनिता मनोरवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग नोंद घेतला होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या