💥परभणीत जिल्हास्तरीय माहिती तंत्रज्ञान सुविधा कक्ष सुरु....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते फित कापून माहिती तंत्रज्ञान सुविधा कक्षाचे करण्यात आले उद्घाटन💥


परभणी (दि. 26 जानेवारी) : जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हास्तरीय माहिती तंत्रज्ञान सुविधा कक्ष फित कापून सुरू करण्यात आला अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाीधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, डॉ. सुशांत शिंदे, निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा उपस्थित होते.


या प्रकल्पांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, व्यवस्थापन आणि क्षमता बदल वापरकर्ता विभाग तयार करण्यात आला आहे. संबंधित प्रणालीतून अंतर्गत क्षमता विकसित करणे आवश्यक असल्यामुळे डीआयटीने माहिती तंत्रज्ञान सुविधा कक्ष स्थापन केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आणि तालुकास्तरीय आयटी सुविधा कक्ष मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून हा सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

माहिती तंत्रज्ञान संचालनालय शासन राज्यात विविध संपूर्ण राज्य माहिती तंत्रज्ञान प्रकल्प राबवत आहे. यातील बहुतांश प्रकल्प महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारत नेट, ई-ऑफिस, स्टेट डाटा सेंटर, आधार प्रकल्प, ई- डिस्ट्रीक्ट, महा-ई-सेवा केंद्र (आपले सरकार केंद्र ), एमएसडब्ल्यूएएन-व्हिडिओ कॉन्फरन्स, डिजिटल पेमेंट, एईबीएएस, ई-खरेदी  पोर्टलचा यात समावेश आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक कैलास मठपती, जिल्हा  नियंत्रण कक्षाचे प्रविण खेर्डेकर, वसंत पिटले,-जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (महाआयटी) निरज धामणगावे, जिल्हा प्रकल्प प्रमुख नारायण माघाडे, वरिष्ठ सहायक अभियंता नरेंद्र आडगांवकर, मिर्झा हुमायू बेग, अतुल नेहाते, राकेश गर्जे, प्रसाद गरुड यांच्यासह माहिती व तंत्रज्ञान विभागातील कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या