💥परभणीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अजित पवार यांच्या विरोधात करण्यात आली जोरदार निदर्शन....!


💥धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देत केली निदर्शन💥

परभणी (दि.02 जानेवारी) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर केव्हाच नव्हते " असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी केल्यामुळे संतप्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परभणी महानगर च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील गव्हाणे चौकात जोरदार निदर्शने केली. 

"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,अजित पवार मुर्दाबाद" अश्या आशयाच्या घोषणा देत ही निदर्शने केली गेली. "अजित पवारांनी महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू प्रेमींची सफशेल माफी मागितली पाहिजे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिव्य असे बलिदान दिले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून अजित पवारांनी माफी नाही मागितली तर भाजपा युवा मोर्चा येणाऱ्या काळात या ही पेक्षा तीव्र आंदोलन छेडेल ज्याची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारांची असेल याची त्यांनी नोंद घ्यावी" असे मत भाजपा युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष रामदास पवार यांनी मांडले. 

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी,मनपा सदस्य मधुकर, माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, सरचिटणीस संजय रिजवानी, राजेश शिरडकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, सरचिटणीस दिनेश नरवाडकर, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अतीख पटेल, विलास मामा चांदवडकर , रशीद खालेद,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुप्रिया कुलकर्णी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे,जिल्हा उपाध्यक्ष अक्षय डहाळे, वैभव शिंदे अजिंक्य औंढेकर, सोशल मीडिया जिल्हासंयोजक माऊली कोपरे, क्रिडा संयोजक मुकेश गाडे, विजया ताई कातकडे,पूनम शर्मा,प्रभावती ताई अन्नपूर्णे,शकुंतला मठपती, गणेश देशमुख,ॲड.गणेश जाधव, पोर्णिमा लोकरे,चिटणीस संजय शामर्थी,सचिव नितीन शुक्ला, मंडळाध्यक्ष ॲड.हनुमान सोमवंशी, आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या